Rohit Pawar । मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व आमदार उपस्थित आहेत. सध्या राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. ( Rohit Pawar )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं आणि हे विधेयक एकमताने मंजूर झाले. आता मुख्यमंत्री हे विधेयक विधान परिषदेत मांडणार आहेत. मात्र, अश्यातच शरद पायावर गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रोहित पवार म्हणाले की, “मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल सवर्पक्षीय आमदारांचे व सरकारचे आभार! मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले ‘आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करुया’ हे शब्द मात्र यापूर्वीचा राजकीय अनुभव बघता भीतीदायक वाटतात! ( Rohit Pawar )
विधेयकाचा मसुदा वरकरणी पाहता त्यात अनेक त्रुटी दिसत असून 28% लोकसंख्या दाखवताना आरक्षण मात्र 10% देण्याचा निर्णय कुठल्या आधारावर झाला, हे स्पष्ट होत नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगासंदर्भात नोंदवलेली निरीक्षणेही दुरुस्त केलेली दिसत नाहीत.
एकदरीतच निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा ठरू नये. असो! हे विधेयक टिकवण्यासाठी सरकारसह सवर्पक्षीय नेते प्रामाणिक प्रयत्न करतील, हा विश्वास आणि अपेक्षा आहे! या आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. ( Rohit Pawar )