Rohit Pawar : दबाव झुगारून धाडस दाखवा! रोहित पवारांचे सुप्रिया सुळेंना भावनिक आवाहन
शरद पवार यांच्या विचारांचा वारसा जपावा, असे भावनिक आवाहन रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून केले आहे.

Rohit Pawar : मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या चर्चेमुळ शरद पवारसाहेब आणि तुमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. ज्या नेत्याने महाराष्ट्रासाठी देशाच्या हितासाठी पुरोगामी विचारांसाठी रक्त आटवले त्या साहेबांवर अशी टीका होत आहे.
साहेब आजारी असल्याने ते भूमिका मांडू शकत नाहीत. अशा वेळी त्यांच्यावर होणारी टीका पाहून माझ्यासारख्याच तुम्हालाही वेदना होत असणार यात शंका नाही. अशा परिस्थितीत दबाव झुगारून धाडसाने निर्णय घ्यावा आणि शरद पवार यांच्या विचारांचा वारसा जपावा, असे भावनिक आवाहन रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून केले आहे.
या पत्रातून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शरद पवार यांच्या राजकीय आणि वैचारिक वारशाचा दाखला दिला आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची कास धरणाऱ्या शरद पवार यांच्या विचारांशी मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका विसंगत ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या पक्षात असणारे काही खासदार आणि आमदार सत्तेत जाण्याच्या विचारात आहेत. त्यांचा आपल्यावर दबाव असणे सहाजीक आहे. पण ज्यांना जायचे त्यांना खुशाल जाऊ द्या, त्यांचे खरे चेहरे समोर येऊ द्या, कुणी गद्दारी करणार असेल तर स्वाभिमानी जनता पुन्हा त्यांना निवडून देणार नाही. कोणताही निर्णय घेताना आमदार-खासदार यांचेच मत महत्वाचे नसते तर जनेतेचे मत विचार देखील महत्वाचे असतात, असे पत्रात (Rohit Pawar) म्हटले आहे.






