Maharashtra Politics : शरद पवार गटात उभी फूट? रोहित पवारांच्या सूचक ट्विटने राजकीय चर्चांना उधाण
Maharashtra Politics : डिलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics : डिलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका सूचक ट्विटमुळे पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. (Maharashtra Politics)
‘2022 मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो. आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल,’ असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षातील काही नेत्यांनाही ही भूमिका मान्य नसल्याचे बोलले जात आहे. अशातच रोहित पवारांच्या ट्विटचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Maharashtra Politics)
अजितदादांच्या आठवणींसोबत रोहित पवारांचे सूचक विधान
दिवंगत अजित पवार यांच्या निधनाला दहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट केली. अजितदादांच्या अपघात की घातपात प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही किंवा तपास झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. (Maharashtra Politics)
‘आभाळाएवढा माणूस गेला, पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितलं आणि बघतोय. मात्र, काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही,’ असे रोहित पवार यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
याच पोस्टमध्ये त्यांनी 2022 मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. त्यावेळी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली असताना नात्यापेक्षा विचारांना महत्त्व देत आपण संघर्ष केला होता. आजही आणि भविष्यातही तीच भूमिका कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
रोहित पवार पक्षात वेगळे पडले?
गेल्या काही काळापासून रोहित पवार राज्यातील महायुती सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी सरकारविरोधात आंदोलने केली असून, ट्रॅक्टर मोर्चाही काढला होता. मात्र, या मोर्चापासून पक्षाने अंतर ठेवल्याची चर्चा झाली होती. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादीच्या बैठकीदरम्यान रोहित पवार यांनी स्वतंत्र बैठक घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे पक्षात त्यांची भूमिका वेगळी असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरूनही पक्षातील मतप्रवाह वेगवेगळे असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics)
आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला…. आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही.
२०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल…!
#AjitdadaPawar
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 28, 2026
अमोल कोल्हेंनी काय सांगितले?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी डिलिमिटेशन विधेयकाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. विधेयकाचा मसुदा नुकताच प्राप्त झाला असून, आठही खासदार त्याचा अभ्यास करणार आहेत. त्यानंतर सर्वांशी चर्चा करून भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर होण्यापूर्वीच वेगवेगळे दावे केले जात असल्याबद्दल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादीची अंतिम भूमिका काय असेल आणि रोहित पवारांच्या सूचक विधानाचा पक्षांतर्गत राजकारणावर काय परिणाम होईल, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; बड्या महिला नेत्याची पक्षातून केली हकालपट्टी





