Rohit Pawar Health : मोठी बातमी..! रोहित पवारांची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट
Rohit Pawar Health : 'अन्नत्याग आंदोलना'दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रकृती दुसऱ्या दिवशी खालावल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.

Rohit Pawar Health : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपुरात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली असून रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या घसरल्याचे आढळले आहे. (Rohit Pawar Health)
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा आणि कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी रोहित पवार १२ जूनपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करत आहेत. “जोपर्यंत कर्जमाफीतील जाचक अटी हटवल्या जात नाहीत आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. (Rohit Pawar Health)
दरम्यान, शनिवारी करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सकाळच्या तुलनेत कमी होऊन 83 mg/dL पर्यंत आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असून तब्येतीत चढ-उतार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. (Rohit Pawar Health)
डॉक्टरांच्या माहितीनुसार, रोहित पवार यांचा रक्तदाब सध्या नियंत्रणात असून तो चिंताजनक पातळीवर नाही. मात्र रक्तातील साखर कमी झाल्यामुळे त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवत आहे. (Rohit Pawar Health)
वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून शरीरातील पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी ओआरएस घेण्यास तसेच आवश्यक असल्यास सलाईन लावण्याची शिफारस केली आहे. (Rohit Pawar Health)
रोहित पवार यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक सातत्याने लक्ष ठेवून आहे. (Rohit Pawar Health)





