US Open 2024 : बोपण्णा-एबडेन जोडीचं आव्हान संपुष्टात…

US Open 2024 (Rohan Bopanna-Matthew Ebden) : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांना पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या दोन्ही खेळाडूंना तिसऱ्या फेरीत अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांच्याकडून 1-6, 5-7 असा पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी, या द्वितीय मानांकित जोडीने स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना आणि अर्जेंटिनाच्या फेडेरिको कोरिया यांच्यावर 6-2, 6-4 असा विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला होता तर पहिल्या फेरीत बोपण्णा-एब्डेन या जोडीनं नेदरलँडच्या रॉबिन हासे – सँडर अरेंड्स यांच्या जोडीला एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता.
Saina Nehwal : सायना नेहवालची ‘या’ आजाराशी झुंज; अचानक निवृत्ती घोषित करण्याची शक्यता…
दरम्यान, अन्य भारतीय खेळाडू एन श्रीराम बालाजी आणि त्याचा अर्जेंटिनाचा साथीदार गुइडो अँड्रॉझी यांना दुसऱ्या फेरीत न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस आणि ग्रेट ब्रिटनचा नील स्कुप्स्की यांच्याकडून पराभव स्विकारावा लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बालाजी-अँड्रॉझी जोडीला दुसऱ्या फेरीच्या सामन्यात व्हीनस आणि स्कुप्स्की या जोडीनं 6-7 (4), 4-6 असे पराभूत केले.





