US Open 2024 : बोपन्ना-सुत्जियादी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत…

US Open 2024 Mixed Doubles (Rohan Bopanna-Aldila Sutjiadi) : – भारताचा रोहन बोपन्ना व इंडोनेशियाची अल्दिला सुत्जियादी यांच्या जोडीने यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्य उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आठव्या मानांकित जोडीने ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि चेक प्रजासत्ताकच्या कॅटेरिना सिनियाकोवा यांच्या जोडीला पराभूत केले.
पहिल्या फेरीत बोपन्ना-सुत्जियादी यांच्या जोडीने जर्मनीच्या टिम पुएत्झ आणि डच खेळाडू डेमी शुअर्सविरुद्ध 7-6(7) ,7-6(5) असा विजय साकारताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता.
शनिवारी उशिरा झालेल्या लढतीमध्ये बोपन्ना-सुत्जियादी यांच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि चेक प्रजासत्ताकच्या कॅटेरिना सिनियाकोवा जोडीचा 0-6, 7-6(5) 10-7 असा पराभव करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही लढत केवळ 73 मिनिटात संपुष्टात आली.
Paris Paralympics 2024 : बॅडमिंटनमधून आनंदाची बातमी, मनीषा रामदास उपांत्य फेरीत दाखल…
उपांत्यपूर्व फेरीत बोपन्ना-सुत्जियादी हे चौथ्या मानांकित मॅथ्यू एब्डेन आणि बार्बोरा क्रेज्सिकोवा यांच्याशी पुढील लढत खेळतील. ही लढत मंगळवारी (3 सप्टेंबर) होईल. भारताच्या रोहन बोपण्णाने एबडेनसह पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना आणि अर्जेंटिनाच्या फेडेरिको कोरियावर 6-2, 6-4 असा विजय मिळवला आहे.





