Rodrigo Paz Pereira : बोलिव्हियाचे अध्यक्ष रॉड्रिगो पाझ यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
बोलिव्हियाचे अध्यक्ष रॉड्रिगो पाझ (Rodrigo Paz Pereira) यांनी एल निनोच्या परिणामांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

Rodrigo Paz Pereira : बोलिव्हियाचे अध्यक्ष रॉड्रिगो पाझ (Rodrigo Paz Pereira) यांनी एल निनोच्या परिणामांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. यामुळे आर्थिक आणि मानवी संसाधनांची जमवाजमव सुलभ होईल, सरकारी संस्थांमधील समन्वय सुधारेल आणि आंतरराष्ट्रीय मदत मिळवण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल, असे पाझ म्हणाले.
बोलिव्हियामधील (Rodrigo Paz Pereira) ६३ समुदाय आधीच दुष्काळामुळे प्रभावित झाले आहेत, तर पशुधन क्षेत्राला जनावरांच्या चाऱ्याच्या मोठ्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान म्यानमारच्या यांगून प्रदेशात, तीव्र एल निनो घटनेच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना अति तापमानापासून वाचवण्यासाठी ६०० हून अधिक उष्णता निवारण केंद्रे उभारण्यात आली आहेत, या केंद्रांची एकत्रित क्षमता दीड लाखांहून अधिक लोकांची आहे.
एल निनो ही एक हवामानविषयक दुष्परिणाम असून त्यामध्ये मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यपणे वाढते. उष्णचेती लाट, वणवे, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, हिमस्खलन हे त्याचेच (Rodrigo Paz Pereira) परिणाम असतात.






