वढेरांची आज पुन्हा चौकशी ! प्रियांका ईडी कार्यालयात उपस्थित, चौकशीपूर्वी म्हणाले, ‘लवकरच वेळ बदलेल…’

Robert Vadra in ED office । हरियाणाच्या शिकोपूर जमीन व्यवहार प्रकरणात आज रॉबर्ट वढेरा यांची पुन्हा चौकशी केली जात आहे. ते सलग दुसऱ्या दिवशी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. रॉबर्ट वढेरा आज त्यांच्या पत्नी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासोबत ईडी कार्यालयात दाखल झाले. रॉबर्ट वड्रा यांची चौकशी सुरू झाली आहे आणि प्रियंका गांधी ईडी मुख्यालयाच्या प्रतिक्षालयात बसल्या आहेत.
ईडीच्या चौकशीवर उद्योगपती रॉबर्ट वढेरा यांनी, “आम्ही कोणालाही घाबरत नाही. राहुल गांधींना संसदेत रोखले जात असो किंवा मला बाहेर रोखले जात असो. आम्ही निश्चितच निशाण्यावर आहोत, परंतु आम्ही सोपे सॉफ्ट टार्गेट नाही, आम्ही एक कठीण टार्गेट आहोत.”असे म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
‘वेळ नेहमीच बदलते…’Robert Vadra in ED office ।
चौकशीला जाण्याअगोदर रॉबर्ट वढेरा यांनी, “वेळ नेहमीच बदलत असते. आज आपण दुःख भोगत आहोत, जर काळ बदलला तर त्यांनाही दुःख सहन करावे लागण्याची शक्यता आहे. मला कशाचीही भीती वाटत नाही, काहीही लपलेले नाही. या प्रकरणात मला खट्टरजींकडून दोनदा क्लीन चिट मिळाली आहे. सात वर्षांनंतरही मला त्याच गोष्टीसाठी का विचारले जात आहे हे मला समजत नाही. मी कधीही दुर्लक्ष करणार नाही. मी पूर्ण ताकदीने इथे आलो आहे. मी सर्व प्रश्नांची उत्तरे देईन.” असे म्हटले आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा निषेध Robert Vadra in ED office ।
ईडीच्या कारवाईविरोधात आज देशातील विविध राज्यांमध्ये आयवायसीसह काँग्रेस कार्यकर्ते ईडी आणि भाजपा विरोधात निदर्शने करत आहेत. काँग्रेसचे लोक दिल्लीतील एआयसीसी कार्यालयातही पोहोचत आहेत.
ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी वढेरा यांची फेसबुक पोस्ट
दरम्यान, रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की, “माझ्या वाढदिवसाच्या आठवड्याची सेवा काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. मी वृद्धांना जेवण देण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील मुलांना भेटवस्तू देण्यासाठी ज्या योजना आखल्या होत्या.” ते पुढे म्हणाले की, लोकांच्या इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. मी येथे कोणत्याही प्रकारच्या अन्याय्य दबावाला तोंड देण्यास तयार आहे. माझा सत्यावर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल.” असा विश्वास देखील व्यक्त केला होता.
याआधी मंगळवारी ईडीने वढेरा यांची सहा तास चौकशी केली होती. पीएमएलए अंतर्गत त्यांचे म्हणणे नोंदवण्यात आले. मंगळवारी वाड्रा म्हणाले होते की ईडीची ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात आहे आणि जेव्हा जेव्हा मी अल्पसंख्याकांचा आवाज उठवतो तेव्हा मला लक्ष्य केले जाते. त्यांनी म्हटले होते की तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे आणि ते यापूर्वीही तपासात सहकार्य करत होते.





