Accident News : महाराष्ट्र हादरला..! पिकअप-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा अंत
Accident News : एक भरधाव पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोर जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Accident News : जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण रस्ता अपघात घडला असून पिकअप वाहन आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Accident News)
आठवडी बाजारावरून परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड येथील आठवडी बाजार करून खंडाळा येथील पारधी वस्तीकडे चव्हाण कुटुंब दुचाकीवरून परतत होते. यावेळी विवाहमांडवा-चौंडाळा रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोन महिला, एक पुरुष आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. (Accident News)
घटनास्थळी हळहळ; पोलिसांचा तपास सुरू
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीवरील चौघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण आणि पिकअप चालकाची जबाबदारी याबाबत पुढील तपास सुरू आहे. (Accident News)
राज्यात अपघातांची मालिका सुरूच
राज्यात गेल्या काही दिवसांपासून भीषण रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतेच सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाचे वाहन विहिरीत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता संभाजीनगरमधील या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Accident News)
Accident News : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; मिरज तालुक्यातील घटना; तिघे जखमी






