Riyan Parag Statement : “हा आमचा सामना होता, पण…”, रियान परागने राजस्थानच्या पराभवाचे खापर कोणावर फोडलं?
Riyan Parag Statement : केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने आपली चूक कबूल केली आहे.

Riyan Parag Statement on KKR vs RR match : ईडन गार्डन्सवर रंगलेल्या आयपीएल २०२६ च्या रोमांचक लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सवर ४ गडी राखून मात केली. विजयासाठी मिळालेल्या १५६ धावांचा पाठलाग करताना केकेआरने ८५ धावांवर ६ बळी गमावले होते, मात्र रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय यांच्या ७६ धावांच्या भागीदारीने राजस्थानच्या तोंडचा घास हिरावला. या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने आपली चूक कबूल केली आहे.
रियान पराग काय म्हणाला?
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना राजस्थान रॉयल्सच्या हातात असतानाही निसटला. ८५ धावांत ६ गडी बाद करूनही रिंकू सिंगने सामना फिरवला. सामन्यानंतर बोलताना रियान पराग म्हणाला की, “आम्ही हार मानली नव्हती, गोलंदाजांनी पुनरागमन करून दिले होते. पण मोक्याच्या क्षणी कॅच सोडणे आम्हाला महागात पडले. महत्त्वाच्या वेळी आम्ही सोपे झेल सोडू शकत नाही आणि हेच आमच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.”
Standing tall when the team needs him most 💪
Rinku Singh keeps the Knights alive as we head straight down the wire! 💜#KKR need 28 runs from 18 balls
Updates ▶️ https://t.co/776nTdPbPj#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvRR pic.twitter.com/VMVdwVR13Z
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
फलंदाजीतील चुका नडल्या –
पिचचा अंदाज येईपर्यंत थोडा उशीर झाला, असे मान्य करत परागने सांगितले की, या खेळपट्टीवर १७० ही चांगली धावसंख्या ठरली असती, पण आम्ही १०-१५ धावा कमी केल्या. “मी आणि शिमरॉन हेटमायर जेव्हा फलंदाजी करत होतो, तेव्हा आम्ही स्थिरावलो होतो. १०-१५ चेंडू खेळल्यानंतर आम्ही आक्रमक खेळणे अपेक्षित होते, पण आम्ही चुकीच्या वेळी विकेट गमावली. जर आम्ही शेवटपर्यंत थांबलो असतो, तर धावसंख्या मोठी झाली असती,” असे परागने नमूद केले.
हंगामातील सलग दुसरा पराभव –
राजस्थान रॉयल्सने या हंगामाची सुरुवात सलग चार विजयांनी धमाकेदार केली होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्याच्या गुणतालिकेत आघाडीवर राहण्यासाठी राजस्थानला आता चुका सुधारून मैदानात उतरावे लागणार आहे. राजस्थानचा पुढील सामना २२ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध होणार असून, त्यात संघ पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे.





