रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपटाची तारीखही जाहीर

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie | अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची सध्या चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून रितेश या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यानचे अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. या चित्रपटात रितेशसह तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील अभिनेता कपिल होनराव याला ‘राजा शिवाजी’ चित्रपटात काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत त्याने ‘मल्हार’ची भूमिका साकारली होती. कपिलने इन्स्टाग्राम एक खास स्टोरी टाकून याची माहिती चाहत्यांना दिली आहे. सोबतच त्याने चित्रपटाच्या रिलीज डेटचे पोस्टर देखील शेअर केले आहे.
View this post on Instagram
इनस्टा स्टोरीवर हे पोस्टर शेअर करत त्याने लिहिले की, “‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला अभिमान आहे. ही संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे.” सध्या ‘राजा शिवाजी’च्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र अद्याप कपिल होनरावने या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारली आहे. याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. हा चित्रपट 1 मे 2026ला रिलीज होणार आहे. Riteish Deshmukh Raja Shivaji Movie |
विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषांमध्ये पाहता येणार आहे. यात रितेश देशमुखसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांचाही समावेश आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून, याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करणार आहेत. Riteish Deshmukh Raja Shivaji Movie |
हेही वाचा:
ज्योती मल्होत्राचे मुंबई कनेक्शन समोर; लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन; फोटोही काढले





