LSG vs SRH : एलएसजीच्या आशा धुळीस! पंतचं अपयश कायम, निराश संजीव गोयंकांचा VIDEO व्हायरल

Rishabh Pant Poor Form in IPL 2025 Sparks Viral Reaction from LSG Owner : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतचा आयपीएल २०२५ मध्येही फलंदाजीतील अपयश कायम आहे. सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धही ऋषभ पंत अपयशी ठरला. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर त्याने ६ चेंडूत फक्त ७ धावा केल्या, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इशान मलिंगाने त्याला झेलबाद केले. अशा प्रकारे पंत पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्यानंतर एलएसजीचे मालक संजीव गोयंका नाराज होऊन ड्रेसिंग रुममध्ये निघून गेले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ऋषभ पंत पुन्हा अपयशी –
ही घटना १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. इशान मलिंगाच्या या चेंडूवर त्याने लेग साईडच्या दिशेला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला आणि झेलबाद झाला. तेव्हा संघाचे मालक संजीव गोयंका स्टेडियमच्या बाल्कनीत उभे होते. कर्णधार आऊट होताच, गोयंका खूप निराश दिसले आणि बाल्कनीतून बाहेर पडला आणि लगेच ड्रेसिंग रूममध्ये गेले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला.
Sanjiv Goenka left the balcony out of anger after seeing 27 crores Rishabh Pant failing in back to back 12th game!! pic.twitter.com/MpOLClJ5rP
— Rajiv (@Rajiv1841) May 19, 2025
निराश झालेल्या संजीव गोयंकांचा व्हिडीओ व्हायरल-
— Sameer Rizvi (@SameerRizvi007) May 19, 2025
संजीवर गोयंकांच्या रिअॅक्शनवर क्रिकेट चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर्सनी कमेंट करताना लिहले केली, ‘ऋषभ पंतने आतापर्यंत संपूर्ण हंगामात संघर्ष केला आहे. सर्वात महागडा खेळाडू पंत पुन्हा एकदा फ्लॉप झाल्यानंतर संजीव गोयंका निराशेने बाल्कनीतून ड्रेसिंग रुममध्ये निघून गेले.’ गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात पंतला एलएसजीने २७ कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.
हेही वाचा – LSG vs SRH : मिचेल मार्शने मारला ५ लाखांचा षटकार! नेमकं काय आहे प्रकरण? पाहा VIDEO
यंदाच्या हंगामातील ऋषभ पंतची कामगिरी –
या हंगामात ऋषभ पंतची कामगिरी सातत्याने निराशाजनक राहिली आहे. त्याने आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये फक्त १३५ धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी फक्त १२.२७ आहे. अशा खराब कामगिरीमुळे संघाच्या प्लेऑफच्या आशा धुळीस मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच व्हायरल व्हिडीओमध्ये संजीव गोयंका नाराज असल्याचे दिसत आहेत.





