Asha Bosle : सचिनच्या ‘नावाचा’ अन् आशाताईंचा आहे खास संबंध! कोणाच्या नावावरुन ठेवलं होतं क्रिकेटच्या देवाचं नाव?
Asha Bosle : विशेष म्हणजे त्यांचं सचिन तेंडुलकरसोबत मायेचं नातं होतं आणि त्याच्या नावाशीही खास कनेक्शन होतं.

Asha Bosle and Sachin Tendulkar Special Bond : भारतीय संगीत क्षेत्रातील अढळ ध्रुवतारा आणि खणखणीत आवाजाच्या स्वामिनी आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ सुरांचे विश्वच नाही, तर क्रिकेट जगतातील त्यांचे निकटवर्तीयही शोकसागरात बुडाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचं सचिन तेंडुलकरसोबत मायेचं नातं होतं आणि त्याच्या नावाशीही खास कनेक्शन होतं.
प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे ‘कार्डियक अरेस्ट’मुळे (हृदयविकाराचा झटका) निधन झाले. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी दिली. आशाताईंनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘दम मारो दम’, ‘परदे में रहने दो’ आणि ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ यांसारखी अजरामर गाणी दिली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणाऱ्या आशाताईंना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
सचिन तेंडुलकरसोबतचं मायेचं नातं –
View this post on Instagram
आशा भोसले आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. आशाताई सचिनला केवळ मानतच नव्हत्या, तर त्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम देत असत. २०२३ मध्ये झालेल्या एका भेटीत सचिनने आशाताईंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती, ज्यावर प्रतिक्रिया देताना आशाताईंनी लिहिले होते की, “सचिन माझ्यासाठी मुलासारखाच आहे.” आज सचिनने आपल्या ‘आई’समान असलेल्या या थोर गायिकेला गमावले आहे.
सूर आणि क्रिकेटचा रंजक संयोग –
सचिन तेंडुलकरचे नाव आणि संगीत यांचा एक विशेष संबंध आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे महान संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) यांचे चाहते होते, त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘सचिन’ ठेवले. विशेष म्हणजे, एस. डी. बर्मन यांचे सुपुत्र आर. डी. बर्मन यांच्याशी आशा भोसले यांचा विवाह झाला होता. अशा प्रकारे संगीताच्या नात्याने आशाताई आणि सचिन यांचे ऋणानुबंध खूप जुने होते.





