Rishabh Pant : ऋषभला इतिहास रचण्याची संधी; फक्त ‘इतक्या’ धावांची गरज, धोनीचा इंग्लंडमधील विक्रम धोक्यात

Rishabh Pant aims to surpass MS Dhoni’s record : भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून सर्व खेळाडूंनी सरावालाही सुरूवात केली आहे. आता २० जूनपासून हेडिंग्ले येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. पहिल्यांदाच टीम इंडिया युवा शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियासोबत नसतील. अशा परिस्थितीत धावा करण्याची जबाबदारी शुबमन गिल आणि ऋषभ पंत सारख्या तरुणांवर असेल.
जर इंग्लंडमध्ये ऋषभ पंतची बॅट चांगली चालली, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम रचेल. पंत इंग्लंडच्या भूमीवर इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. जर त्याने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २२२ धावा केल्या, तर तो महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडेल आणि इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक-फलंदाज ठरेल.
काय आहे हा विक्रम?
— BCCI (@BCCI) June 8, 2025
इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी यष्टीरक्षक-फलंदाजांच्या यादीत माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी अव्वल स्थानावर आहे. धोनीने इंग्लंडमध्ये २३ डावांमध्ये एकूण ७७८ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रॉड मार्श, दक्षिण आफ्रिकेचा जॉन वेट, ऑस्ट्रेलियाचा इयान हीली, वेस्ट इंडिजचा जेफ दुजोन आणि भारताचा फारुख इंजिनियर यांचा या यादीत समावेश आहे.
हेही वाचा – Shashank Singh : ‘त्याने मला कानाखाली लगावली पाहिजे होती…’, श्रेयस अय्यरद्दल शशांक सिंगचं असं का म्हणाला?
ऋषभ पंत या विक्रमाच्या किती जवळ आहे?
ऋषभ पंत ५५६ धावांसह या यादीत सातव्या क्रमांकावर आहे आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याने फक्त १७ डावांमध्ये या धावा केल्या आहेत. याचा अर्थ असा की पंतकडे हा आकडा ओलांडण्याच्या अनेक संधी आहेत आणि जर त्याने त्याच्या आक्रमक शैलीत खेळणे सुरू ठेवले तर तो लवकरच एमएस धोनीचा विक्रम मागे टाकू शकतो.
हेही वाचा – IPL 2025 मधून BCCI ने किती केली कमाई? आकडा पाहून व्हाल अवाक्
इंग्लंडमध्ये कसोटीत परदेशी यष्टीरक्षक-फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावा :
- एमएस धोनी (भारत) – ७७८ (२३ डाव)
- रॉड मार्श (ऑस्ट्रेलिया) – ७७३ (३५ डाव)
- जॉन वेट (दक्षिण आफ्रिका) – ६८४ (२७ डाव)
- इयान हीली (ऑस्ट्रेलिया) – ६२४ (२४ डाव)
- जेफ दुजोन (वेस्ट इंडीज) – ६०४ (२० डाव)
- फारुख इंजिनिअर (भारत) – ५६३ (१७ डाव)
- ऋषभ पंत (भारत) – ५५६ (१७ डाव)





