Rishabh Pant Captain : बीसीसीआयने ऋषभ पंतवर सोपवली मोठी जबाबदारी! ‘या’ संघाच्या कर्णधारपदी केली नियुक्ती
Rishabh Pant Captain : बीसीसीआयने भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Rishabh Pant Appointed Rest Of India Captain Irani Cup Sarfaraz Khan Vice Captain : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून भारतीय संघात स्थान न मिळालेल्या स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी धुरा सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने ऐतिहासिक इराणी चषक २०२६ (Irani Cup 2026) सामन्यासाठी पंतची ‘रेस्ट ऑफ इंडिया’ (Rest of India) संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याच्या जोडीला मुंबईचा आक्रमक फलंदाज सर्फराझ खानकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा सामना १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर रणजी चॅम्पियन जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळवला जाईल.
आकाश दीपच्या फिटनेसवर नजर; वेगवान आक्रमणात मुकेश कुमारची साथ!
लोअर-बॅक स्ट्रेस इंज्युरीमुळे दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेला वेगवान गोलंदाज आकाश दीपचे संघात पुनरागमन झाले आहे; मात्र त्याचे खेळणे फिटनेस चाचणीवर अवलंबून असेल. विशेष म्हणजे, त्याने आपला शेवटचा सामना फेब्रुवारी २०२६ मध्ये रणजी चषकात जम्मू-काश्मीरविरुद्धच खेळला होता. आकाश दीपहून व्यतिरिक्त वेगवान गोलंदाजीची धुरा मुकेश कुमार, मुकेश चौधरी आणि युवा आर्यन पांडे यांच्या खांद्यावर असणार आहे.
रणजीचे टॉप स्कोरर संघात दाखल; श्रीलंकेत चमकलेल्या फिरकीपटूंना संधी!
🚨 News 🚨
Rest of India squad announced for the Irani Cup against the Ranji Trophy champions Jammu & Kashmir.
Rishabh Pant [C, WK], Sanat Sangwan, Shikhar Mohan, Sudip Gharami, Sarfaraz Khan [VC], Smaran Ravichandran, Manav Suthar, Saransh Jain, Akash Deep*, Mukesh Kumar,…
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 16, 2026
संघात गेल्या रणजी हंगामात धावांचा पाऊस पाडणाऱ्या अव्वल फलंदाजांना स्थान मिळाले आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आघाडीवर राहिलेले आर. स्मरण आणि आयुष दोसेजा रेस्ट ऑफ इंडियाच्या मधल्या फळीत दिसतील. फिरकी विभागाची जबाबदारी अनुकूल रॉय, मानव सुथार आणि सारांश जैन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मानव सुथार आणि सारांश जैन नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका कसोटी मालिकेतही भारतीय संघाचा भाग होते.
पंतसाठी फॉर्म सिद्ध करण्याची सुवर्णसंधी; १ ऑक्टोबरपासून महासंग्राम!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या व्हाईट बॉल मालिकेतून बाहेर राहावे लागल्यानंतर ऋषभ पंतसाठी स्वतःचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करण्यासाठी ही लढत अत्यंत मोलाची ठरणार आहे. १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान श्रीनगरमध्ये रंगणाऱ्या या पाच दिवसीय महामुकाबल्यात पंत आणि सर्फराझच्या नेतृत्वाखालील ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघ रणजी विजेत्या जम्मू-काश्मीरला त्यांच्याच घरच्या मैदानावर कडवे आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे.





