Rishabh Pant Injury : टीम इंडियाला पहिल्या वनडेपूर्वी मोठा धक्का! सराव सत्रात स्टार खेळाडूला दुखापत

Rishabh Pant Injury ahead IND vs NZ 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला उद्या, ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मात्र, या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय गोटातून चिंतेची बातमी समोर आली आहे. वडोदरा येथे शनिवारी झालेल्या सराव सत्रादरम्यान स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत जखमी झाला असून, त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेट्समध्ये सराव करताना पंतला लागला चेंडू –
सराव सत्रात ऋषभ पंत भारतीय थ्रोडाऊन तज्ज्ञांच्या चेंडूंचा सामना करत होता. यावेळी एक वेगवान चेंडू थेट त्याच्या कंबरेच्या वरच्या भागाला लागला. चेंडू लागताच पंत वेदनेने विव्हळताना दिसला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफने तातडीने धाव घेत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पंतला काही काळ मैदानाबाहेर जावे लागले. अद्याप त्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती आलेली नाही.
अजित आगरकर आणि शुबमन गिलमध्ये खलबतं –
Rishabh Pant suffered an injury scare after copping a blow just over the waist during the Indian team’s practice session on Saturday in Vadodara.
📸: Sportstar | Revsportz #INDvNZ #RishabhPant #TeamIndia pic.twitter.com/2BgSZKk75O
— Circle of Cricket (@circleofcricket) January 10, 2026
ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर काही वेळातच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार शुबमन गिल यांच्यात दीर्घकाळ चर्चा रंगली. पंत जर उद्याच्या सामन्यात खेळू शकला नाही, तर संघात कोणाला संधी द्यायची, यावर ही चर्चा झाल्याचे समजते. गेल्या वर्षभरात पंतने एकही वनडे सामना खेळलेला नसल्याने, या मालिकेद्वारे त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष होते.
हेही वाचा – GG vs UPW : गुजरात जायंट्सचा ऐतिहासिक श्रीगणेशा! तीन वर्षांचा वनवास संपला; यूपी वॉरियर्सची झुंज अपयशी
सिराजला ‘हिटमॅन’च्या बॅटिंग टिप्स –
या सराव सत्रात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सिराजने गोलंदाजीपेक्षा फलंदाजीच्या सरावावर अधिक भर दिला. नेटच्या बाहेर उभे असलेल्या रोहित शर्माकडे सिराजने फलंदाजीच्या काही टिप्स मागितल्या. सिराज जेव्हा शॉट्स मारताना चुकत होता, तेव्हा रोहित त्याला बॅट कशी धरायची आणि पोझिशन कशी घ्यायची, याचे धडे देताना दिसला.
हेही वाचा – Jemimah Gavaskar Song : ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…’; गावस्करांनी पाळला जेमिमाला दिलेला शब्द! पाहा VIDEO
विजय हजारे खेळून खेळाडू संघात दाखल –
ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे ८ जानेवारीला विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळून संघात दाखल झाले आहेत. उपकर्णधार श्रेयस अय्यरने केएल राहुलसोबत फलंदाजीचा कसून सराव केला, तर रवींद्र जडेजानेही नेट्समध्ये बराच वेळ घालवला.





