IND vs ENG : पंतचा पराक्रम आणि विवाद: लीड्स कसोटीत शतकांनंतर आयसीसीने फटकारले!

IND vs ENG Rishabh Pant Punished from ICC : लीड्स कसोटी ऋषभ पंतसाठी कायमची स्मरणीय ठरली आहे. त्याने कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतके झळकावली. असे करणारा तो जगातील केवळ दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. इतकेच नव्हे, तर परदेशी भूमीवर असे करणारा तो पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत फक्त चार दिवसांचा खेळ झाला असून, एक दिवस बाकी आहे. या शेवटच्या दिवशीच सामन्याचा निकाल ठरेल आणि कोणता संघ विजय मिळवेल हे स्पष्ट होईल. दरम्यान, ऋषभ पंतला फटकार बसली आहे. खरे तर, पंतने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केले होते, ज्याचा परिणाम त्याला भोगावा लागला आहे.
लीड्स कसोटी सामन्यादरम्यान, जेव्हा इंग्लंड संघ फलंदाजी करत होता, तेव्हा ऋषभ पंत यष्टिरक्षक म्हणून मैदानावर होता. त्यानी अंपायरकडे जाऊन गोलंदाजाच्या चेंडूबाबत तक्रार केली आणि चेंडू त्याच्या बॉलगेजमधून काढण्याची विनंती केली. अंपायरने पहिल्यांदा ही विनंती मान्य केली, परंतु पंत यावर समाधानी झाला नाही आणि त्यानी पुन्हा तशीच मागणी केली. यावेळी अंपायरने त्यांची विनंती नाकारली. यामुळे नाराज झालेल्या पंतने चेंडू हातात घेऊन तो जोरात जमिनीवर आपटला. हा त्यांचा राग व्यक्त करण्याचा मार्ग होता, परंतु आयसीसीने ही बाब गंभीरपणे घेतली आहे.
आयसीसीने ऋषभ पंतला फटकारले –
Team India wicketkeeper-batter Rishabh Pant has been reprimanded by the ICC for expressing dissent at the umpire’s decision to not change the ball during England’s first innings. He also received a demerit point.#ENGvIND #RishabhPant #TeamIndia pic.twitter.com/Bk8yw0XduJ
— Circle of Cricket (@circleofcricket) June 24, 2025
ऋषभ पंतला आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला फटकारण्यात आली असून, आयसीसीने त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुण जोडला आहे. तथापि, याचा सध्या कोणताही परिणाम होणार नाही. पंतने लेव्हल १ चे उल्लंघन केले आहे. असे समजते की पंतने आपला अपराध कबूल केला आहे, त्यामुळे याप्रकरणी आता पुढे कोणतीही कारवाई होणार नाही.
हेही वाचा – IND vs ENG : लीड्स कसोटीत ऋषभ पंतची कमाल; शतकानंतर यष्टीमागेही केला मोठा पराक्रम
ऋषभ पंतवर डिमेरिटचा काय होणार परिणाम ?
ऋषभला एक डिमेरिट पॉइंट मिळाल्याने सध्या कोणताही परिणाम होणार नाही. पण या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. जर एखाद्या खेळाडूने २४ महिने म्हणजेच दोन वर्षांच्या कालावधीत चार किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट पॉइंट्स मिळवले, तर त्याच्यावर काही सामन्यांमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. तथापि, पंतला प्रथमच हा डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
ऋषभने दोन्ही डावांमध्ये झळकावली शतकं –
ऋषभने सामन्याच्या पहिल्या डावात १७८ चेंडूत १३४ धावांची खेळी साकारली. यात १२ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरल्यानंतर पंतने १४० चेंडूत ११८ धावांची खेळी केली. यावेळी पंतने १५ चौकार आणि तीन षटकार लगावले. आता पंत भारताच्या त्या मोजक्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे, ज्यांनी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.





