Rishabh Pant : ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

लीड्स : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत याने दुसऱ्या इनिंगमध्ये शतक झळकावून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऋषभ पंतने या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 134 रन केले होते तर दुसऱ्या इनिंगमध्ये 18 रनची खेळी केली. एकाच टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक करणारा ऋषभ पंत हा भारताचा पहिला आणि जगातला दुसरा विकेट कीपर बनला आहे.
ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास
ऋषभ पंतने 130 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. ऋषभने याच सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा शतकीय कामगिरी केली होती. तेव्हा लागोपाठ दोन इनिंगमध्ये शतक ठोकणारा तो भारताचा पहिला विकेटकिपर फलंदाज ठरला. यापूर्वी कोणत्याही भारतीय विकेटकिपरने अशी कामगिरी केली नव्हती. यापूर्वी झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर या विकेटकिपर फलंदाजाने 2001 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. ऋषभ पंतने शतक ठोकल्यावर तो पुढच्याच ओव्हरमध्ये शोएब बशीरच्या बॉलचा शिकार ठरला.
Sunny ji Asking Rishabh pant for sommersault celebration 🥹🤍 pic.twitter.com/ZHak9eR7La
— U’ (@18toxify) June 23, 2025
ऋषभ पंतचे सेलिब्रेशन
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने शतक केल्यानंतर कोलांटी उडी मारून सेलिब्रेशन केलं होतं, त्यानंतर ऋषभ पंत दुसऱ्या इनिंगमध्येही शतक केलं, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सुनिल गावसकर यांनी त्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं आणि त्याला कोलांटी उडी मारण्याचा आग्रह केला. ऋषभ पंतने मात्र गावसकरांकडे बघून पुढच्या शतकानंतर असं सांगितलं.
भारताची प्लेईंग 11
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
इंग्लंडची प्लेईंग 11
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर





