IND vs ENG : ऋषभ पंतच्या जिद्दीला सलाम! दुखापतग्रस्त असतानाही अर्धशतक झळकावत लावली विक्रमांची रांग

बुधवारी मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना पंतला दुखापत झाली होती. ख्रिस वोक्सचा वेगवान यॉर्कर चेंडू त्याच्या पायाच्या बोटावर आदळल्याने फ्रॅक्चर झाले होते. तरी देखील तो दुखापतग्रस्त असतानाही संघाच्या मदतीला आला आणि फलंदाजी केली. त्याने ७५ चेंडूचा सामना करताना ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. यासह त्याने अनेक विक्रमांची रांग लावली.
THE WARRIOR WALK BY PANT. 🦁
– Rishabh Pant has walked out to bat with an injured toe. 🫡🇮🇳 pic.twitter.com/O6xg4C5bmz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 24, 2025
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
- ९० – ऋषभ पंत
- ९० – वीरेंद्र सेहवाग
- ८८ – रोहित शर्मा
- ७८ – एमएस धोनी
- ७४ – रवींद्र जडेजा
हेही वाचा – Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान आमनेसामने; ‘या’ देशांत होणार आशिया कपचे आयोजन
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा ५० पेक्षा धावा करणारे भारतीय यष्टिरक्षक
- ५ – ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड, २०२५
- ४ – फारुख इंजिनियर विरुद्ध इंग्लंड, १९७२/७३
- ४ – एमएस धोनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००८/०९
- ४ – एमएस धोनी विरुद्ध इंग्लंड, २०१४
हेही वाचा – IND vs ENG : बीसीसीआयने ऋषभ पंतबद्दल दिली मोठी अपडेट, गरज पडल्यास तो फलंदाजी करेल पण…
इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणारे यष्टीरक्षक –
- ४७९ – ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड, २०२५
- ४६४ – अॅलेक स्टीवर्ट विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १९९८
- ४१५ – जेमी स्मिथ विरुद्ध भारत, २०२५
- ३८७ – जॉनी बेअरस्टो विरुद्ध श्रीलंका, २०१६





