IND vs NZ 2nd Test : ऋषभ पंत पुणे कसोटीत खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकानं दिली मोठी अपडेट…

IND vs NZ 2nd Test In Pune : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने भारताकडून चमकदार कामगिरी केली. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 99 धावा केल्या. या सामन्यादरम्यान पंतला दुखापत झाली. त्याच्या फिटनेसची चिंता वाढली होती. पण आता एक चांगली बातमी मिळाली आहे. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी सांगितले की, पंतची दुखापत ठीक आहे आणि तो पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठीही मैदानात उतरू शकतो.
पुणे कसोटीसाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. पंतच्या फिटनेसवर त्याने प्रत्युत्तर दिले. डोशेट म्हणाले, “पंत ठिक आहे आणि तो पुणे येथील कसोटी सामन्यात खेळू शकतो.” ऋषभ पंतने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 20 धावा तर दुसऱ्या डावात 99 धावा केल्या. या डावात तो शतक झळकावण्यास मुकला होता. या खेळीदरम्यान पंतने 9 चौकार आणि 5 षटकार मारले होते.
Maharashtra Cricket Association Stadium, Pune 📍 #INDvNZ pic.twitter.com/ZSjm5yrXug
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 22, 2024
पंतने पुणे कसोटीसाठी सरावाला केली सुरुवात..
टीम इंडिया पुण्यात पोहोचली आहे. रेवस्पोर्ट्ज (RevSportz) नुसार, ऋषभ पंतनेही मंगळवारी सराव केला. नेटमध्ये सराव करताना त्याने अनेक मोठे फटके मारले. टीम इंडियाचा युवा खेळाडू शुभमन गिलही फिट झाला आहे. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला तर खेळाडूंच्या फलंदाजीच्या क्रमात बदल होऊ शकतो. गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
टीम इंडियाचं पुण्यात कसं आहे रेकाॅर्ड…
महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम पुण्याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे तर येथे भारतीय संघानं आतापर्यंत फक्त 2 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी एक सामना भारतीय संघाने जिंकला आहे तर एकामध्ये पराभव पत्करला आहे. पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेला ज्यात टीम इंडियाने एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला ज्यात ऑस्ट्रेलियाने 333 धावांनी विजय मिळवला होता. आता त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ फॉर्मात आहेत. बंगळुरूमध्येही दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली होती.





