IPL 2025 : ‘रिंकू सिंगपासून सावध राहा…’, विराटनंतर आता रोहितकडे केली ‘ही’ मागणी, मुंबईने सर्वांना केले सतर्क

Rinku Singh se savdhaan rahen MI shared video : मंगळवारी आयपीएल २०२५ मध्ये मुंबईने (MI) कोलकाताचा (KKR) ८ विकेट्सनी धुवा उडवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एमआयने ११७ धावांचे लक्ष्य सहज गाठले. बुधवारी एमआयने केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगचा एक मजशीर व्हिडीओ शेअर केला. रिंकूने एमआय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन रोहित शर्माला बॅट मागितली. याआधी रिंकूने स्टार क्रिकेटर विराट कोहलीकडूनही अशी मागणी केली आहे. २०२४ च्या आयपीएल दरम्यान तो कोहलीकडून बॅट मागताना दिसला होता. त्यानंतर कोहलीने रिंकूला बॅट दिली होती पण ती तुटली. बॅट तुटल्यानंतर, रिंकू पुन्हा कोहलीकडून बॅट मागताना दिसला होता.
चालू हंगामात रिंकू सिंग रोहितच्या मागे लागला आहे. मात्र, रोहितने रिंकूच्या मागणीकडे फारसे लक्ष दिले नाही. जेव्हा रिंकू रोहितकडून बॅट मागत होता, तेव्हा एमआयचा तिलक वर्मा जवळच बसला होता. तिलक म्हणाला, “रिंकूकडे स्वतःच्या नावावर बॅट आली आहे. ही खूप चांगली बॅट आहे. तरी पणरोहित भैय्याकडून बॅट मागत आहे.” त्याच वेळी, एमआयचा कर्णधार हार्दिक पंड्या तिथून गेला. हार्दिकने रिंकूला बॅटबद्दल विचारले. यानंतर, रिंकू हसत म्हणाला, “मी खरोखरच तिलकला भेटायला आलो होतो.”
मुंबई इंडियन्सने रिंकू सिंगचा व्हिडीओ केला शेअर
Rinku se 𝙨𝙖𝙫𝙙𝙝𝙖𝙖𝙣 𝙧𝙖𝙝𝙚, 𝙨𝙖𝙩𝙖𝙧𝙠 𝙧𝙖𝙝𝙚 🤣💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/2NPuXCzURY
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2025
व्हिडिओच्या शेवटी, रोहितची बॅट अंगकृश रघुवंशीच्या हातात दिसते. या संवादाचा व्हिडीओ एमआयने शेअर केला आणि त्याला हास्य आणि हृदयस्पर्शी इमोजीसह कॅप्शन दिले. ज्यामध्ये लिहिले, “रिंकूपासून सावध राहा, सावध राहा.” रिंकूच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा फाऊस पाडत आहे. एका चाहत्याने लिहिले की, “रिंकू भाईकडे प्रत्येक मुलाच्या स्वप्नातील बॅटचा संग्रह असला पाहिजे,”
हेही वाचा – Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या लेकीने IPL 2025 दरम्यान खरेदी केला नवीन संघ, काय आहे नाव? जाणून घ्या
दुसऱ्यानी लिहिले की. “हार्दिक-रिंकू एका कडक शिक्षक आणि एका खोडकर विद्यार्थ्यासारखे वागत आहेत, जे ब्रेक संपल्यानंतरही खेळाच्या मैदानावर नेहमीच दिसतात,”अजून एक चाहता म्हणाला, “रोहित भाई मला बॅट द्या. रिंकूचा फॉर्म चांगला नाहीये, कोणाला माहित आहे की काही सुधारणा होईल का?” रिंकू सिंगने आतापर्यंत तीन सामन्यांपैकी दोन डावात २९ धावा केल्या आहेत. मुंबईविरुद्ध तो १४ चेंडूत फक्त १७ धावा करू शकला, ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. गतविजेत्या केकेआरने दोन सामने गमावले आहेत.





