Rinku Singh : रिंकू सिंगवर यूपी सरकारने सोपवली नवी जबाबदारी; बीएसए म्हणून नियुक्त, किती मिळणार सॅलरी? जाणून घ्या

Rinku Singh BSA salary : टी-२० फॉर्मेटमधील विस्फोटक फलंदाज रिंकू सिंगला आज संपूर्ण जग ओळखते. त्यानी आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. टी-२० च्या छोट्याशा कारकिर्दीत त्यानी खूप प्रसिद्धी मिळवली. क्रिकेटमुळे त्याला ओळख मिळण्यापूर्वी त्यांचे जीवन खूपच संघर्षमय होते. आता उत्तर प्रदेश सरकारने रिंकू सिंगला मोठी जबाबदारी दिली आहे. योगी सरकारने रिंकू सिंगची यांची मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
याचा अर्थ, आता रिंकू क्रिकेटसोबतच आपल्या राज्याला शिक्षण क्षेत्रातही सेवा देणार आहे. आयपीएल २०२५ नंतर रिंकू सिंगनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा केला होता. त्यानंतर लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की शिक्षण अधिकारी झाल्यानंतर रिंकू सिंगला उत्तर प्रदेश सरकार किती पगार देईल? याबाबत जाणून घेऊया.
रिंकू सिंगला किती पगार मिळणार?
पेश हैं हमारे सबसे ताज़ा तारीन 9वीं पास जिला बेसिक शिक्षा अधिकारी!!!
BSA Rinku Singh, मतलब यह औपचारिक रूप से शायद ही इस पद कार्य करें, लेकिन एक पद और वेतन….????? pic.twitter.com/VKKBEBAxAQ— बेसिक शिक्षा सूचना केंद्र (@Info_4Education) June 26, 2025
रिंकू सिंग आता क्रिकेटबरोबरच उत्तर प्रदेश सरकारकडूनही कमाई करणार आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबात प्रचंड आनंद आहे. आता तो मूलभूत शिक्षण अधिकारी (बेसिक एजुकेशन ऑफिसर) बनला आहे. त्यामुळे त्यासा या काळात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा (नॅशनल पेंशन स्कीम) लाभ मिळेल. या पदाच्या पगाराबद्दल बोलायचे झाले, तर अहवालानुसार रिंकू सिंगला उत्तर प्रदेश सरकारकडून अंदाजे ५७,००० ते ६२,००० रुपये इतका पगार मिळू शकतो.
हेही वाचा – IND vs ENG : ‘मोठ्या लक्ष्याचा पाठलाग, सातत्याचा संकल्प’, बेन स्टोक्सने सांगितले लीड्स कसोटीच्या यशाचे गुपित
शिक्षण अधिकारी यांची मूळ वेतन सुमारे ४७ हजार रुपये आहे. यामध्ये रिंकू सिंगच्या वेतनात प्रवास भत्ता, मर्यादा भत्ता (डीए) आणि गृहनिर्माण भत्ता (एचआरए) यासारख्या खर्चांचा समावेश असेल. रिंकू सिंगना क्रिकेटसोबतच ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. जेव्हा तो क्रिकेटपासून मोकळा असेल, तेव्हा तो उत्तर प्रदेशात शिक्षणासाठी काम करताना दिसेल.





