Rinku Singh : आयपीएल २०२५ पूर्वी रिंकू सिंगला मिळाल्या दोन गुड न्यूज! KKR संघात आणि यूपी सरकारमध्ये मिळाली मोठी जबाबदारी
Rinku Singh : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याच्यासाठी दुहेरी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Rinku Singh KKR Vice Captain UP Govt Job :आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याच्यासाठी दुहेरी आनंदाची बातमी समोर आली आहे. रिंकूच्या आयुष्यात ‘देवाच्या प्लॅन’चा एक नवा आणि सुवर्ण अध्याय सुरू झाला आहे.
उत्तर प्रदेशचा ‘लाडका’ फलंदाज रिंकू सिंग सध्या यशाच्या शिखरावर आहे. एका बाजूला उत्तर प्रदेश सरकारने त्याला प्रादेशिक क्रीडा अधिकारी (RSO) म्हणून नियुक्त केले आहे, तर दुसरीकडे आयपीएल २०२६ साठी कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
उत्तर प्रदेश सरकारची मोठी भेट –
क्रिकेटर रिंकू सिंह के लिए यूपी सरकार ने ₹3 करोड़ कैश और स्पोर्ट्स ऑफिसर की नौकरी का ऐलान किया है. कल रिंकू सिंह सरकारी कार्यकम में नही आ सके.
उन्होने वीडियो जारी करके CM से खेद जताया है और जल्द ही आशीर्वाद लेने को आने का वायदा किया है. pic.twitter.com/B5MYbz3Fby
— Narendra Pratap (@hindipatrakar) March 25, 2026
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने रिंकू सिंगला केवळ शासकीय नोकरीच दिली नाही, तर ३ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्याचा गौरव केला आहे. रिंकू आता प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंचे प्रशिक्षण आणि स्टेडियम व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणार आहे.
किती मिळणार वेतन?
या पदासाठी त्याला ५०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत वेतन आणि सरकारी निवासस्थान, वाहन यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने रिंकूने व्हिडिओद्वारे मुख्यमंत्र्यांची माफी मागितली असून लवकरच आशीर्वाद घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले आहे.
केकेआरचा नवा ‘व्हाईस कॅप्टन’ –
Captain. Vice-Captain. Sorted 😌💜 pic.twitter.com/reeySu1chL
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 24, 2026
केकेआरच्या ‘नाईट्स इनप्लग्ड ३.०’ या कार्यक्रमात सीईओ वेंकी मैसूर यांनी रिंकू सिंगच्या उपकर्णधारपदाची घोषणा केली. २०१८ पासून केकेआरशी एकनिष्ठ राहिलेल्या रिंकूने ५९ सामन्यांत १०९९ धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या मार्गदर्शनाखाली रिंकू आता संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
केकेआरने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये याला “देवाच्या प्लॅनचा नवा चॅप्टर” असे संबोधले आहे. रिंकूची ही प्रगती त्याच्या संघर्षाचे फळ असून, आयपीएल २०२६ मध्ये तो नव्या भूमिकेत काय कमाल करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





