Rinku Rajguru: रिंकू राजगुरुने मराठी शाळेला दिली भेट; म्हणाली “जिद्द, समाधान आणि आनंदाने जगण्याचा खरा धडा”
Rinku Rajguru: व्हिडीओमध्ये रिंकू शाळेतील मुलांबरोबर गप्पा मारत असल्याचे आणि त्यांना खाऊ देत असल्याचे पाहायला मिळते.

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुने अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय ती सोशल मिडियाद्वारे चाहत्यांच्या देखील संपर्कात असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मिडियावर शेअर करते. आता रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकूने मराठी शाळेला भेट दिल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये रिंकू शाळेतील मुलांबरोबर गप्पा मारत असल्याचे आणि त्यांना खाऊ देत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. मुलेही निरागसपणे तिच्या बोलताना, गप्पा मारताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी रिंकूने फोटो देखील शेअर केले आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत रिंकूने लिहिले, “या जिल्हा परिषद शाळेकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. शाळेच्या परिसरात खूप सुविधा नाहीत. तरीही ही निरागस मुलं मोठी स्वप्नं आणि चेहऱ्यावर हसू घेऊन दररोज शाळेत येतात.
View this post on Instagram
त्यांनी मला शिकवलं की कितीही अचडणी असल्या तरी आशा, कृतज्ञता आणि सतत शिकत राहण्याची जिद्दीपासूनच खरे शिक्षण सुरू होते. आज त्यांच्याकडून जिद्द, समाधान आणि आनंदाने जगण्याचा खरा धडा मिळाला.” या व्हिडीवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले आहे.
रिंकू राजगुरूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी ती ‘पुन्हा साडे माडे तीन’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याआधी तिने ‘आशा’, ‘बेटर हापची लव्ह स्टोरी’, ‘झिम्मा २’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘झुंड’, ‘अनकहीं कहानियाँ’, ‘मेकअप’, ‘कागर’ अशा अनेक सिनेमांत प्रमुख भूमिका साकारली. मात्र तिला पहिल्या ‘सैराट’ चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. Rinku Rajguru
हेही वाचा:
Sangli News: आटपाडीत 1 कोटी 7 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त





