Rinku Rajguru Romeo post : अभिनेत्री रिंकू राजगुरूला सैराट चित्रपटातील ‘आर्ची’ या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर तिने अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. मात्र सध्या ती सोशल मिडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने आपल्या खासगी आयुष्यातील प्रेमाची गोड कबुली दिली आहे. रिंकून इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्याची सुरुवात डार्लिंग अशी आहे आणि तुझ्या प्रेमात वेडी झालीये, असं रिंकू सांगते. काही दिवसांपूर्वी रिंकूने आपल्या आयुष्यात कुणीतरी विशेष व्यक्ती असल्याचे सांगितले होते. आता तिने इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीची सुरुवातच “डार्लिंग, तुझ्या प्रेमात वेडी झालीये!” अशा ओळीने झाली आहे. रिंकूने या पोस्टला ‘आय एम सो इन लव्ह विथ यू’ हे रोमँटिक इंग्रजी गाणे जोडले आहे. गाण्यात “मी तुझ्या प्रेमात पडले आहे, तुझ्यासाठी वेडी झाले आहे, तुझ्यावरून क्षणभरही नजर हटवू शकत नाही” अशा ओळी आहेत. दरम्यान, रिंकूने ही पोस्ट नेमकी कोणासाठी हे देखील सांगितले आहे. तर रिंकूने ज्याच्यासाठी ही पोस्ट केली आहे तो रोमिओ म्हणजे शेक्सपियरच्या ज्युलिएटचा रोमिओ नव्हे, तर रिंकूचा लाडका पेट डॉग ‘रोमिओ’! रिंकूने याच पोस्टमध्ये फोटोही टाकला आहे. Rinku Rajguru Romeo post ज्यात मागे एक छोटा टेडी आणि त्याच्या मागे छोटा पपी दिसत आहे. रिंकून रोमिओ नावासोबत पुढे हार्ट आणि डॉगचे फुटप्रिंट्सही टाकले आहेत. रिंकूने आपल्या या लाडक्या कुत्र्याला ‘डार्लिंग’ म्हणून संबोधून प्रेम व्यक्त केले आहे. Rinku Rajguru Romeo post हेही वाचा : Onion Price crash : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची राज्य सरकारकडे मागणी, अन्यथा…