Nandita Patkar : ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; साध्या पारंपरिक लुकने वेधलं सर्वांच लक्ष
Nandita Patkar : नंदिता ‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिपार’ या मालिकेतून घराघरात पोहचली.

Nandita Patkar : अभिनेत्री नंदिता पाटकरने (Nandita Patkar) अनेक मराठी मालिकांसह चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत. मात्र आता नंदिताने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर नंदितानं दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंदिताने विपूल महागावकर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
नंदिता ‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिपार’ या मालिकेतून घराघरात पोहचली. याच मालिकेतील तिची सहअभिनेत्री साक्षी गांधीने इन्स्टाग्रामवर नंदिताच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. Nandita Patkar
यावेळी तिने या नवविवाहित जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. साक्षीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत त्यामधून नंदिता व विपूल यांच्या लग्नाचा फोटो शेअर करत त्याला “तायडे खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी मी खूप आनंदी आहे. लव्ह यू” असं म्हटलं आहे.
नंदिता व विपूलचा पारंपरिक वेडिंग लुक Nandita Patkar
नंदिता व विपूल यांनी साध्या व पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे. लग्नासाठी दोघांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी नंदिताने सोनेरी रंगाची साडी नेसली असून त्यावर सिंपल मेकअप केला आहे.
यावेळी तिने हातात हिरवा चुडा, गळ्यात हार आणि मंगळसूत्र तसेच नाकात नथ परिधान केल्याचं दिसतं. तर विपूल यांनी सुद्धा लग्नासाठी साधा आणि सिंपल लूक केला आहे. त्यांनीसुद्धा सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केल्याचं दिसतं.
दरम्यान, नंदिताने काही वर्षांपू्र्वी तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. ती अनेकदा मुलाखतींमधून तिच्या घटस्फोटाबद्दल आणि त्यानंतरच्या संघर्षाबद्दलही बोलली आहे.
दरम्यान, विपूल महागावकर रंगभूमीवरील दिग्दर्शक असल्याचं त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये लिहिलं आहे. तर नंदिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांच्याबरोबर ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात काम करत आहे. याशिवाय तिने ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये साकारलेल्या भूमिकेचेही कौतुक झाले होते.
हेही वाचा:






