Richa Chadha and Ali Fazal: रिचा चड्ढा आणि अली फजलची जोडी ‘फुकरे’नंतर पुन्हा एकत्र
Richa Chadha and Ali Fazal : शशी वर्मा दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात दोघे एकत्र

Richa Chadha and Ali Fazal : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पत्नी रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे इंडस्ट्रीतील लाडक्या जोडप्यांपैकी एक मानले जातात. लग्नानंतर हे दोघेही कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नव्हते. पण आता प्रेक्षकांना त्यांना एकत्र पाहण्याची ही संधी पहिल्यांदाच मिळणार आहे.
रिचा आणि अली फजल लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शशी वर्मा दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात दोघे एकत्र दिसणार आहे. मात्र अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. (Richa Chadha and Ali Fazal)
यापूर्वी या दोघांनी ‘फुकरे’ चित्रपटात एकत्र काम केले आहे, परंतु त्यात रिचाची भूमिका नकारात्मक होती. मात्र, आता पहिल्यांदाच रिचा आणि अली फजलची जोडी मुख्य भूमिकेत ऑनस्क्रीन कपल म्हणून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
अली फजल आणि रिचा चड्ढा यांचा हा नवीन चित्रपट दिल्लीच्या पार्श्वभूमीवर आधारित एक ‘सिच्युएशनल कॉमेडी’ असेल, ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते कुमुद मिश्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
या चित्रपटाचे शूटिंग २०२६ च्या शेवटी सुरू होण्याचा अंदाज असून, एप्रिल २०२७ मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाबाबत रिचा आणि अली फजल या दोघांनीही आनंद व्यक्त केला आहे. (Richa Chadha and Ali Fazal)
अली फजलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तो लवकरच ‘मिर्झापूर: द मुव्ही’ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. याशिवाय, अली फजल ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
त्याचबरोबर तो ‘लस्ट स्टोरीज ३’ मध्येही झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्याच्या ‘राख’ या वेब सीरिजमुळे मोठी पसंती मिळत आहे. यात पोलिसाच्या भूमिकेतून असून, यात त्याने साकारलेल्या पात्राचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले.
हेही वाचा:
Nashik : नियतीचा क्रूर खेळ! कर्तव्यावर असताना पॅरा कमांडोचा करुण अंत; सिन्नर तालुक्यावर शोककळा






