ऋचा आणि अली फजल लवकरच गुड न्युज देणार!

Richa Chadha Pregnancy : अभिनेत्री ऋचा चढ्ढा आणि अली फजल हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहे. लॉकडाऊनच्या काळातच दोघांनी कायम सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षीच या जोडप्याने त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले. आता या जोडप्याने घोषणा केली आहे की ते लवकरच पालक होणार आहेत.
या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. रिचा आणि अलीने 9 फेब्रुवारीला सोशल मीडियावर एका फोटोद्वारे ही माहिती दिली. “लहान हृदयाचा ठोका हा आपल्या जगातील सर्वात मोठा आवाज आहे,” अलीने 1+1=3 शब्दांसह एका इंस्टाग्राम फोटोला कॅप्शन दिले.
ही बातमी कळताच त्यांचे मित्र आणि नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दोघांचे अभिनंदन केले आहे. एका यूजरने लिहिले की, “मिनी गुड्डू भैया”. याशिवाय अनेक यूजर्सनी या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांचं लग्न ४ ऑक्टोबर २०२२ झाले. याआधी त्यांनी दिल्लीत प्री-वेडिंग सेरेमनी केली होती. त्यानंतर आम्ही लखनऊमध्ये लग्न केले. यानंतर मुंबईत लग्नाचे रिसेप्शनही आयोजित करण्यात आले होते.





