Rhea Chakraborty । रिया चक्रवर्ती बनली ‘ब्राऊन कुडी’

Rhea Chakraborty । अलिबाग बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे ‘रिया चक्रवर्ती’. मात्र रिया आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. रिया सोशल मीडियावर सक्रिय असून तिने नेहमीच तिचे फोटोशूट शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते.
View this post on Instagram
रिया चक्रवर्ती तिने सोशल मीडिया काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहे. या फोटोवरून तिला चाहते ‘ब्राउन कुड़ी’ म्हणत आहे. या फोटोत तिने ब्रॉउन रंगाचा फुल बॉडी कॉम ड्रेस घातला आहे. या फोटोवर चाहते लाईक कंमनेट्सचा वर्षाव करत आहे.
यापूर्वीही रियाची एक पोस्ट खूप व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “पुन्हा उठण्याची, पुन्हा उडण्याची आणि पुन्हा पुन्हा स्वप्न पाहण्याची हिंमत बाळगा. जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवणारे खूप कमी लोक होते… माझा स्वतःवर विश्वास होता. हे त्या सर्व मुलींसाठी आहे.” हे करा. स्वतःसाठी आणि एकमेकांनासह उंच भरारी घ्या… #girlPower”.
या फोटोवर काही चाहत्यांनी तिच्यावर कंमेंट्सचा वर्षाव केला आहे, तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. रिया चक्रवर्तीने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीच्या टीन डीवाज़ या शोमधून केली होती. यानंतर ती व्हीजे झाली आणि एमटीव्हीवर तिने काही शो होस्ट केले. रियाने मेरे डॅड की मारुती, सोनाली केबल, जलेबी, हाफ गर्लफ्रेंड, चेहरे, बँक चोर आणि दोबारा: सी युवर एविल यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय अलीकडेच तो एमटीव्ही रोडीज 19 या रिॲलिटी शोमध्ये गँग लीडरच्या भूमिकेतही दिसला होता.





