नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडमधील परिस्थितीचा आढावा घेतला.मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिह रावत यांना सर्व सहाय्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उत्तराखंडमधील पूरग्रस्त भागात इंडो तिबेटीयन पोलिस आणि राष्ट्रीय आपत्कालीन पथकांचे जवान पाठवण्यात आले आहे.
हिमकडा कोसळल्याने झालेल्या नुकसानीचे नेमके स्वरूप समजू शकले नाही. मात्र, खूप मोठी जीवित आणि वित्त हानी झाली असल्याची भीती व्यक्त होत आहे. बचाव कार्यात एनडीआरएफची अनेक पथके तैनात करण्यात आली आहे. ही पथके दिल्लीहून विमानाने पाठवण्यात आल्याचे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आपत्कालीन पथकाची चार पथके मदतकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. ही दूर्घटना घडताच डेहराडूनहून जोशीमठ गावात दोन पथके तातडीने पाठवण्यात आली. दिल्लीतून आणखी तीन ते चार पथके विमानाने पाटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले.