पुणे जिल्हा | महसूलचे उपक्रम लोकहिताची ; देऊळगावराजेत दाखल्यांचे वाटप

देऊळगावराजे, (वार्ताहर)- लोकांची वेळेत कामे व्हावी आणि वेळ आणि पैसा यांचे बचत व्हावी म्हणून अशा महसूल पंधरवड्याचे उपक्रम राबवण्यात येतात, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार ममता भंडारी यांनी दिली.
दौंड महसूल विभागामार्फत देऊळगावराजे येथे महसूल पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विभागांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले वाटप करणे, रेशन कार्डविषयी शिबिर, नाव कमी करणे किंवा वाढवणे, मतदार नोंदणी अभियान, शासकीय कामात स्वच्छता शिबिर,
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, सैनिकांची प्रलंबित कामे व निपटारा तसेच स्वामी चिंचोली आणि बोरीपार्धी येथे दिव्यांगांसाठी योजना आदी विविध योजना राबवल्या आहेत.
हा कार्यक्रम प्रत्येक मंडलांच्या ठिकाणी महास्वराज्य शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. देऊळगावराजे या ठिकाणी विविध ७७ कामांचा निपटारा करण्यात आला आहे.
यावेळी हरिभाऊ ठोंबरे, राधिका पाहणे, अभिमन्यू गिरमकर, पंढरीनाथ पासलकर, विष्णुपंत सूर्यवंशी, पंकज बुराडे, बाबूराव पासलकर, कानिफ सूर्यवंशी, त्रिंबक गिरमकर, दादा गिरमकर, महसूलचे सर्व अधिकारी, नागरिक उपस्थित होते. दिनेश पवार यांनी आभार केले.





