Revati Sule Wedding : रेवती सुळेंच्या शाही विवाह सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी; पहा संपूर्ण यादी
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी संपन्न झाला.

Revati Sule Wedding : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी संपन्न झाला. या विवाहसोहळ्याला राजकारण, उद्योग, कला, क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. (Revati Sule Wedding)
सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र असून उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. (Revati Sule Wedding)

विवाहसोहळ्यात उपस्थित मान्यवर
राजकीय क्षेत्र
मोहन भागवत
राहुल गांधी
मल्लिकार्जुन खर्गे
शरद पवार
सुप्रिया सुळे
उद्धव ठाकरे व कुटुंबीय
राज ठाकरे व कुटुंबीय
संजय राऊत व कुटुंब
ओमर अब्दुल्ला
सुनील तटकरे
जयंत पाटील
रोहित पवार
सुनेत्रा पवार
पार्थ पवार
जितेंद्र आव्हाड
दिग्विजय सिंह
अनुराग ठाकूर
के. सी. वेणुगोपाल
प्रफुल्ल पटेल
मुकुल वासनिक
बाळासाहेब थोरात
विशाल पाटील
अमोल कोल्हे
निशिकांत दुबे
बासुरी स्वराज
धीरज देशमुख
शशिकांत शिंदे
राजेश टोपे
सुशीलकुमार शिंदे
प्रणिती शिंदे
सतेज पाटील
दिलीप वळसे पाटील
नरहरी झिरवळ
पंकजा मुंडे
चंद्रशेखर बावनकुळे
संदीपान भुमरे
श्रीकांत भारतीय
अतुल सावे
रेवंथ रेड्डी
भगवंत मान
अखिलेश यादव
ए. राजा

उद्योग क्षेत्र
मुकेश अंबानी
नीता अंबानी
अनंत अंबानी
अनिल अंबानी
गौतम अदानी
प्रीती अदानी
आदर पूनावाला
बॉलिवूड व मनोरंजन
अमिताभ बच्चन
जया बच्चन
शाहरुख खान
करण जोहर
अभिनेता व खासदार रविकिशन
अन्य मान्यवर
प्रतापराव पवार कुटुंब
जय पवार व ऋतुजा पाटील
पूर्वा वळसे पाटील
किरण वळसे पाटील
शिवानी वड्डेटीवार
कायनात धार
या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने देशातील विविध राजकीय पक्षांचे नेते, उद्योगजगत, चित्रपटसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज एकाच मंचावर पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेते, तसेच दोन्ही ठाकरे कुटुंबीय आणि विविध विचारधारांतील मान्यवरांची उपस्थिती हा या सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरला. (Revati Sule Wedding)





