Pune News : शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी आलेल्या सुनेला मारहाण; निवृत्त ACP सुनील पवार यांच्यासह १० महिला बाऊन्सर्सवर गुन्हा
Pune News : पुण्यातील हायप्रोफाइल आयटी हब असलेल्या बालेवाडी परिसरात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.

Pune News : बालेवाडी येथे शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी सासरी आलेल्या विवाहितेला घरात प्रवेश नाकारून तिच्यावर कथितपणे मारहाण केल्याप्रकरणी सासू सुप्रिया पवार, सासरे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, पत्नी सुप्रिया पवार आणि ८ ते १० अज्ञात महिला बाऊन्सर्सविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास बाणेर पोलीस करीत आहेत. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इशिका प्रतीक पवार (३०) या १४ जुलै रोजी नोकरी व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी बालेवाडी येथील सासरी गेल्या होत्या. मात्र, सासू सुप्रिया पवार यांनी त्यांना घरात प्रवेश नाकारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्या घराच्या पार्किंगमध्ये थांबल्या होत्या. (Pune News)
फिर्यादीनुसार, रात्रीच्या सुमारास तेथे एक महिला बाऊन्सर आली. त्यानंतर आणखी ८ ते १० महिला तेथे जमा झाल्या. त्यांचा मोबाईलवर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असताना महिलांनी मोबाईल हिसकावून घेतला. (Pune News)
त्यानंतर सर्वांनी मिळून हाताबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना घराच्या गेटबाहेर रस्त्यावर फेकून दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारादरम्यान सुप्रिया पवार आणि सुनील पवार उपस्थित असून त्यांनी महिला बाऊन्सर्सना “तिला मारा, गेटच्या बाहेर फेकून द्या,” असे सांगून मारहाण करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
घटनेनंतर पिडीतेने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मागील आठवड्यात त्यांच्यावर बाणेर पोलीस ठाण्यात सुनेचा कौटुंबिक छळ केल्याचा गुन्हा दाखल आहे. (Pune News)





