पुणे जिल्हा | जनसंवाद यात्रेचा अहवाल पवारांना सादर

पारगाव, (वातार्र्हर) – दिग्विजय जेधे यांनी 13 दिवस पायी चालत दौंड तालुका जनसंवाद यात्रेचा केलेला अहवाल मुंबई येथे सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांना सादर केला.
दौंड जनसंवाद पदयात्रा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून दिग्विजय जेधे यांनी पायी चालत दौंड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढल्यामुळे आपल्या पक्षाचा विचार सर्वदूर पोहोचत आहे.
तुम्ही स्वयंस्फूर्तीने काढलेल्या या पदयात्रेमुळे पक्षाचे चिन्ह व विचार घरोघरी पोचत आहे, असे उद्गार शरद पवार यांनी काढले. सिल्व्हर ओक येथे पवार यांची भेट घेऊन.
यावेळी दौंड जनसंवाद पदयात्रेचा अहवाल आणि देशभक्त केशवराव जेधे यांचे चरित्र पवार यांच्या हाती सुपूर्द करत 1 ते 13 ऑगस्ट या कालावधीत 350 किमी चालत केलेल्या पदयात्रेची माहिती जेधे यांनी दिली.
दौंड विधानसभा मतदारसंघ गेल्या 10 ते 15 वर्षांपासून अनेक विषयांत हा तालुका अत्यंत पिछाडीवर आहे. येथील जनता विधानसभेला तुतारीच्या चिन्हावर लढणार्या उमेदवाराला विजयी करून पवार यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी सज्ज असल्याचे जेधे यांनी पवार यांना सांगितले.
विधानसभेला पवारांच्या नेतृत्वात आम्ही तुतारी चिन्हावर लढणारा उमेदवारच विजयी करू, असा निर्धार आम्ही पवारांसमोर व्यक्त केला. त्याच त्या चेहर्यांना दौंडमधील जनता आता वैतागली असून तालुक्याला आता तिसरा नवीन चेहरा पाहिजे.
आता हवा बदल नवा, अशी मागणी होताच पवारांनी या मागणीला दुजोरा देत एकमताने योग्य तो उमेदवार देऊ आणि यावेळी दौंडमध्ये परिवर्तन घडवून, असे प्रतिपादन केले. दिग्विजय जेधेंनी केलेली ही मेहनत आणि पक्षाच्या प्रचाराचे लोकांत जाऊन केलेले काम कौतुकास्पद आहे.
आता लोकसभेप्रमाणे आपल्याला विधानसभेलाही तुतारीच्या चिन्हावर लढणार्या उमेदवारालाच विजयी करायचे आहे.
दौंडमध्ये यंदा बदल घडवायचा आहे. अशी भावना पवारांनी या वेळी व्यक्त केली. यावेळी राजेंद्र पांढरे, तुषार ताकवणे, स्वप्निल शिंदे, विजय कड, यश जेधे, सचिन दिवेकर, अक्षय दिवेकर, राकेश शेळके, शुभम गायकवाड उपस्थित होते.





