Nagar | रेणुका काळेला जपानमध्ये २४ लाखांचे वार्षिक पॅकेज

कोपरगाव, (प्रतिनिधी): संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन विभागाच्या प्रयत्नामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या रेणुका दत्तात्रय काळे हिला जपानमधील टोकियोस्थित ‘डेटा-एक्स’ कंपनीने तिला अवगत असलेल्या जापनीज भाषेच्या एन ३ लेव्हलपर्यंतच्या कौशल्याच्या जोरावर व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भारतीय चलनानुसार वार्षिक पॅकेज २४ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे.
रेणुकाच्या या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी रेणुकासह वडील दत्तात्रय काळे, आई प्रेरणा काळे यांचा सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकूर, विभागप्रमुख डॉ.डी. बी. क्षीरसागर व इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन विभागाचे डीन प्रा. अतुल मोकळ उपस्थित होते.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनीही रेणुका व तिच्या आई वडिलांचे अभिनंदन करून रेणुकाला शुभेच्छा दिल्या.
संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजने हिरामेकी या जापनीज भाषा शिकविणाऱ्या एका नामांकित कंपनीशी सामंजस्य करार केला आहे.
या करारांतर्गत एशिया टू जपान या कंपनीने प्रायोजित केलेला फास्ट ऑफर इंटरनॅयशनल प्रोग्रामच्या माध्यमातून जपानमध्ये नोकरीसाठी निवड झाली. या माध्यमातून रेणुका ही तिसरी अभियंता ठरली आहे.
‘मी नगर एमआयडीसी येथे किराणा दुकान चालवन कुटूंबाचा चरितार्थ भागवितो. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच प्रवेश घेण्याची रेणुकाची तीव्र इच्छा होती.
मी सुध्दा संजीवनीच्या नावलौकिकाबाबत एकूण होतो. रेणुकाला येथेच प्रवेश मिळाला आणि आम्ही निश्चित झालो. कारण रेणुकाला संजीवनीच्या माध्यमातूनच नोकरी मिळेल, हा विश्वास होता आणि तो सार्थ ठरला. दत्तात्रय काळे, वडील
‘माझ्या कॉलेजच्या शिक्षकांनी मला घडविण्यासाठी घेतलेले कष्ट आणि माझ्या आई-वडिलांचे भक्कम पाठबळ, यामुळे मला जपानमध्ये नोकरी मिळाली.
आमच्या संपुर्ण कुटूंबातुन नोकरी करणारी आणि परदेशात जाणारी मी पहिली मुलगी ठरली आहे. हे संजीवनीमुळे शक्य झाले. – रेणुका काळे, नवोदित अभियंता





