‘माझी सुरक्षा तातडीने काढा आणि जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करा’; सुप्रिया सुळेंनी केली गृहमंत्र्यांकडे विनंती

Supriya Sule on Police Protection | कोलकतामध्ये डॉक्टर महिलेचा बलात्कार करून तिची हत्या केलेल्या घटनेनंतर बदलापूरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापुरातील आदर्श महाविद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगाराने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अत्याचारानंतर पीडित मुलीच्या पालकांना 12 तास पोलिस ठाण्यात ताटकळत उभे ठेवले.
यानंतर मंगळवारी मोठ्या संख्येने बदलापूरकर रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलनाला हिसंक वळण लागल्याचेही पाहायला मिळाले. या घटनेननंतर आता सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझी सुरक्षा तातडीने काढून जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करा, असे त्यांनी म्हंटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाउंटवर ट्वीट करत लिहिले की, “महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे.” Supriya Sule on Police Protection |
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही.…
— Supriya Sule (@supriya_sule) August 21, 2024
“दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की, कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.” Supriya Sule on Police Protection |
“यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे आज पुण्यात बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.
हेही वाचा:
विधानसभापूर्वी ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी? हसन मुश्रीफांना आव्हान देण्याची शक्यता





