पतंजली जाहिरात प्रकरणात बाबा रामदेव यांना दिलासा; मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने केला बंद

Patanjali Misleading Ads Case| पतंजली जाहिरात प्रकरणात बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारीत केल्या प्रकरणी योगगुरू रामदेव, त्यांचे सहकारी बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांनी मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यानुसार त्यांनी आज त्या विषयी रामदेव बाबा व अन्य संबंधीतांवरील न्यायालयाची बेअदबी केल्या प्रकरणाची कारवाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, ‘आम्ही स्वामी रामदेव, पतंजली आणि बाळकृष्ण यांची माफी स्वीकारली आहे. भविष्यात या प्रकरणात पुन्हा असे काही घडू नये, अशी सक्त ताकीद आम्ही त्यांना दिली आहे. याप्रकरणी दिलेले प्रतिज्ञापत्र पूर्णपणे पाळावे. ‘रामदेव यांनी कोर्टात हजर असतानाच या प्रकरणी माफी मागितली आहे.
बाबा रामदेव, बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांनी दिलेल्या हमींच्या आधारे न्यायालयाने अवमानाची कारवाई बंद केली आहे, अशी माहिती त्यांचे वकील गौतम तालुकदार यांनी दिली. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने या प्रकरणात रामदेव, बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना बजावलेल्या अवमान नोटीसवर १४ मे रोजी आपला आदेश राखून ठेवला होता. Patanjali Misleading Ads Case|
रामदेव बाबांच्या जाहीरातींवर इंडियन मेडिकल असोशिएशनने आक्षेप घेतला होता. दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. याचिकेत कोविड लसीकरण मोहीम आणि औषधांच्या आधुनिक प्रणालींविरोधात कथितपणे चुकीची माहिती देणारी मोहीम चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पतंजली आणि योग गुरुराम देव यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते.
याबाबत बाब रामदेव यांच्यावर २७ फेब्रुवारी रोजी आपल्या विरोधात अवमानना कारवाई का सुरू करू नये अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने बजावली होती. परंतु यापुढे आमच्याकडून अशी कृती होणार नाही अशी ग्वाही बाबा रामदेव व पतंजली संस्थने कोर्टात दिली आहे. त्या आधारावर ही कारवाई रद्द करण्यात आली आहे. Patanjali Misleading Ads Case|
हेही वाचा:
अजित पवार यांची कबुली म्हणाले,’बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती’





