जिओचा धमाका! लाँच केला कमी किंमतीत जास्त फायदे देणारा रिचार्ज प्लॅन, 5G डेटा-13 ओटीटी फ्री

Jio New Recharge Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी कमी किंमतीत येणारा नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनीने 445 रुपये किंमतीचा प्रीपेड प्लॅन लाँच केला असून, यामध्ये अनेक फायदे देण्यात आले आहेत. कंपनीचा हा प्लॅन जुनाच आहे. जिओने 448 रुपयांच्या प्लॅनची किंमत 3 रुपयांनी कमी करून या रिचार्ज प्लॅनला सादर केले आहे.
जिओचा 445 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या 445 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये यूझर्ससाठी अनलिमिटेड डेटा देखील समाविष्ट आहे. दररोजचा 2 जीबी डेटा संपल्यानंतर कमी स्पीडसह इंटरनेट वापरता येईल.
या प्लॅनची मुदत 28 दिवस आहे. यामध्ये तुम्हाला JioTV, JioCloud, SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi, आणि FanCode सारख्या अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.
जिओचा 448 रुपयांचा प्लॅन
जिओने 445 रुपयांच्या प्लॅनसोबतच 448 रुपयांचा प्लॅन देखील कायम ठेवला आहे. नवीन 448 रुपयांचा प्लॅन फक्त व्हॉइस आणि एसएमएससाठी आहे. यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, एकूण 1000 एसएमएस आणि 84 दिवसांची मुदत मिळते. याशिवाय, जिओटीव्ही, जिओसिनिमा आणि जिओक्लाऊडचे सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध नाही.





