Jio Recharge Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे ग्राहकांच्या सुविधेसाठी एकापेक्षा एक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे अगदी 200 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी दररोज 3 जीबी 5जी डेटा, ओटीटी सबस्क्रिप्शनसह येणारे प्लॅन्स देखील ऑफर करते. कंपनीच्या अशाच जबरदस्त फायद्यांसह येणाऱ्या प्लॅन्सविषयी जाणून घेऊयात. जिओचा 449 रुपयांचा प्लॅन जिओच्या 449 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. हा कंपनीचा दररोज 3 जीबी डेटासह येणारा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस, दररोज 3 जीबी डेटा आणि JioTV, JioCloud, JioCinema चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जिओचा 1199 रुपयांचा प्लॅन जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 3 जी डेटा दिला जातो. याशिवाय, दररोज सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस दिला जातो. जिओचा 1799 रुपयांचा प्लॅन 1799 रुपये किंमतीच्या या प्लॅनची मुदत 84 दिवस आहे. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. याशिवाय, 84 दिवसांसाठी Jio Apps आणि Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. तुम्ही जर 5जी स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेटचाही फायदा मिळेल.