Jio Recharge Plans: जिओचे धमाकेदार प्लॅन्स, अनलिमिटेड 5G डेटासह नेटफ्लिक्स मोफत, पाहा डिटेल्स

Jio Best Recharge Plans: तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग, भरपूर डेटा आणि मोफत ओटीटीसह येणारे रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर टेलिकॉम कंपनी जिओकडे असेच काही शानदार रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. जिओकडे 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे काही प्लॅन्स उपलब्ध असून, यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5जी डेटाचा देखील फायदा मिळेल. जिओच्या अशाच काही खास प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जिओचा 1299 रुपयांचा प्लॅन
जिओचा (Jio Recharge Plans) 1299 रुपये किंमतीचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2जी डेटाचा फायदा मिळले. तसेच, ठराविक यूजर्सला अनलिमिटेड 5जी डेटा देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय, नेटफ्लिक्स (मोबाइल), जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा मोफत अॅक्सेस देखील मिळतो. या प्लॅनमध्ये जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन मिळणार नाही.
जिओचा 1799 रुपयांचा प्लॅन
जिओच्या (Jio) या प्लॅनची वैधता 84 दिवस असून, यामध्ये तुम्हाला दररोज 3जीबी डेटा याप्रमाणे एकूण 252 जीबी डेटा दिला जातो. तसेच, ठराविक यूजर्सला अनलिमिटेड 5जी डेटाचा देखील फायदा मिळेल. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटफ्लिक्स (मोबाइल), जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा मोफत अॅक्सेस मिळतो. यामध्ये जिओ सिनेमाचे नॉन प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील मिळते.
जिओचा 749 रुपयांचा प्लॅन
तुम्ही जर पोस्टपेड यूजर असाल तर जिओचा 749 रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 100 जीबी डेटा दिला जातो. तसेच, घरातील 3 सदस्यांना देखील या प्लॅनचा फायदा घेता येईल. अॅड ऑन सिमसाठी दरमहिन्याला अतिरिक्त 5जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा देखील फायदा मिळतो. प्लॅनसोबत नेटफ्लिक्स (Netflix), 2 वर्षांसाठी अॅमेझॉन प्राइम लाइट, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा मोफत अॅक्सेस मिळेल.





