Jio चा धमाका! पुन्हा लाँच केला 189 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, पाहा फायदे

Jio Recharge Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्लॅन्स लाँच करत असते. ट्रायच्या नियमानंतर सध्या कंपनी केवळ वॉइस कॉलिंग आणि एसएमएस सुविधेसह येणारे सादर करत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी 189 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला होता. मात्र, आता ग्राहकांसाठी या प्लॅनला पुन्हा लाँच करण्यात आले आहे.
189 रुपयांचा प्लॅन MyJio अॅपवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्राहक या अॅपवर जाऊन रिचार्ज करू शकतात. जिओच्या 189 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची मुदत 28 दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 2 जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण 300 मोफत एसएमएसची सुविधा दिली जाते. याशिवाय, JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सब्सक्रिप्शन मिळते.
तुम्ही जर जास्त दिवसांच्या मुदतीसह येणारे प्लॅन शोधत असाल तर कंपनीकडे 448 रुपये आणि 1748 रुपये किंमतीचे प्लॅन देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला केवळ कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा दिला जात नाही.
Vi चा 470 रुपयांचा प्लॅन
व्हीआयकडे केवळ वॉइस आणि कॉलिंगसह येणारा 470 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 900 एसएमएसचा फायदा मिळतो. 900 एसएमएस समाप्त झाल्यानंतर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
Airtel चा 199 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी एकूण 2 जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. याशिवाय, मोफत हेलोट्यून्स आणि एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचे सबस्क्रिप्शन मिळते.





