मीरा कपूरच्या वेलनेस ब्रँड लाँन्चमधील रेखाच्या एव्हरग्रीन लुकने वेधलं सगळ्यांच लक्ष, फोटो पाहिलेत का?

Actress Rekha : बॅालीवूडचा अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने ३० मे रोजी तिच्या वेलनेस ब्रँड लाँन्स केला. या वेलनेस ब्रँड लाँन्च कार्यक्रमाचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मीराला पाठिंबा देण्यासाठी बी टाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहिद आणि मीराला सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, या कार्यक्रमातील काही फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने काल ३० मे रोजी तिचा वेलनेस ब्रँड लाँच केला. या कार्यक्रमाला बॅालीवूडमधील करण जोहरपासून अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री रेखा देखील या सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहिली होती. या कार्यक्रमातील रेखाचा एव्हरग्रीन लुक पाहायला मिळाला. तिच्या या लुकमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
स्किनकेअर ब्रँडनंतर, बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या पत्नीने स्वतःचा वेलनेस ब्रँड लाँन्च केला आहे. यासाठी या जोडप्याने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक मोठे स्टार आले होते. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री रेखा अतिशय क्लासी लूकमध्ये दिसली. रेखाने या कार्यक्रमात एका आकर्षक आणि सुंदर लुकमध्ये सहभागी झाली होती. व्यासपीठावर येत तिने शाहिदच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात रेखा पुन्हा एकदा तिच्या एव्हरग्रीन लूकमध्ये दिसली. तिने सुंदर फिकट जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तिच्या एव्हरग्रीन लुकने सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे विधून घेतले. डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा घातला होता. रेखा कार्यक्रमात प्रवेश करताच सर्वांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या होत्या. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी रेखाचे उत्साहात स्वागत केले आणि अभिनेत्रीशी गप्पा मारल्या. यानंतर, तिघांनीही पापाराझींसाठी एकत्र पोज दिली. या तिघांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. रेखा व्यतिरिक्त करण जोहर, ईशान खट्टर, पंकज कपूर आणि नेहा धुपिया यांनी आणि इतर अनेक स्टार्सं या कार्यक्रमाला उपस्थित होते.





