Kangana Ranaut : “तुमच्या या लोकप्रियतेचा आणि सौंदर्याचा…”; गिरीजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ टॅगवर कंगना राणौतची मजेशीर प्रतिक्रिया
Kangana Ranaut : गिरिजा ओकने सांगितले की, तिच्या एका पॉडकास्टमधील क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.

Kangana Ranaut : अभिनेत्री गिरिजा ओक आणि कंगना राणौत आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा असून चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या एका संवादादरम्यान गिरिजा ओकने स्वतःला ‘नॅशनल क्रश’ म्हणून मिळालेल्या लोकप्रियतेचा किस्सा सांगितला, ज्यावर कंगनाने दिलेली मजेशीर प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
गिरिजा ओकने सांगितले की, तिच्या एका पॉडकास्टमधील क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे, त्या क्लिपमधील तिच्या व्यक्तिमहत्वाची आणि निळ्या साडीतील लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. या अनपेक्षित प्रसिद्धीबद्दल बोलताना गिरिजा मिश्किलपणे म्हणाली की, हे तिचं वैयक्तिक यश नसून पिढीजात मिळालेल्या सौंदर्याचं फळ असावं. (Kangana Ranaut)
यावर कंगनाने लगेचच हसत प्रतिक्रिया देत, “म्हणजे तुमच्या सौंदर्यामुळेच ती क्लिप व्हायरल झाली,” अशी टिप्पणी केली. त्यानंतर तिने गिरिजाला चिडवत म्हटले, “अरे वा! तुम्ही तर नॅशनल क्रश राहिल्या आहात. हे खरंच अविश्वसनीय आहे. तुम्ही आमच्या चित्रपटात आहात याचा आनंद आहे. आता तुमच्या या लोकप्रियतेचा आणि सौंदर्याचा वापर आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही करा.” (Kangana Ranaut)
हेही वाचा : Sayali Sanjeev: भूतानच्या सर्वात लांब पुलावर सायली संजीवची सफर; स्टायलिश फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष
दरम्यान, दिग्दर्शक मनोज तापडिया यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा भारत भाग्य विधाता चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित सत्य घटनांवर प्रेरित आहे. हा चित्रपट दहशतवाद्यांवर नव्हे, तर मुंबईतील कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटलच्या येथील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या शौर्य आणि सेवाभावावर प्रकाश टाकतो. हल्ल्याच्या काळात या कर्मचाऱ्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले होते. (Kangana Ranaut )

Kangana Ranaut : “तुमच्या या लोकप्रियतेचा आणि सौंदर्याचा…”; गिरीजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ टॅगवर कंगना राणौतची मजेशीर प्रतिक्रिया
चित्रपटात कंगना रनौत (Kangana Ranaut ) एका नर्सच्या भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत गिरिजा ओक, स्मिता तांबे, अमृता नामदेव, प्रिया बेर्डे, रसिका आगाशे यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





