Uorfi Javed: मेट गालातील व्हायरल ‘बबल ड्रेस’ उर्फीने केला रीक्रिएट; BTS व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली धूम
Uorfi Javed उर्फीने स्वतः सांगितले की, हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण फॅशन एक्सपेरिमेंट्सपैकी एक होता. तिने मजेशीर अंदाजात म्हटले की, “मूळ ड्रेस कोट्यवधी रुपयांचा होता, पण आम्हाला तो कमी बजेटमध्ये तयार करायचा होता.” तिच्या या वक्तव्याचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

Uorfi Javed: सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी अभिनेत्री आणि फॅशन इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत आली आहे. वेगवेगळ्या आणि अनोख्या ड्रेसिंग स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या उर्फीने यावेळी मेट गाला २०२६ मधील व्हायरल ‘बबल ड्रेस’ स्वतःच्या अंदाजात रीक्रिएट केला आहे. तिचा हा लूक आणि त्यामागचा BTS म्हणजेच ‘बिहाइंड द सीन’ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मेट गाला २०२६ मध्ये ऑलिम्पिक खेळाडू आणि फॅशन आयकॉन एलीन गु हिने घातलेल्या खास ड्रेसने जगभरातील फॅशनप्रेमींचे लक्ष वेधले होते. प्रसिद्ध डिझायनर आइरिस वॅन हर्पेन यांनी तयार केलेल्या या ड्रेसमध्ये हजारो काचेचे बबल्स आणि मायक्रो टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे चालताना या ड्रेसमधून खऱ्या बबल्ससारखा इफेक्ट दिसत होता. त्यामुळे हा ड्रेस मेट गालातील सर्वात चर्चेचा विषय ठरला होता. रिपोर्टनुसार, हा ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल २५५० तास लागले होते.
View this post on Instagram
आता हाच आयकॉनिक ड्रेस उर्फी जावेदने कमी बजेटमध्ये स्वतःच्या स्टाइलमध्ये तयार केला आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या BTS व्हिडीओमध्ये तिची टीम ड्रेस तयार करण्यासाठी किती मेहनत घेत आहे, हे स्पष्ट दिसते. ड्रेसचा स्ट्रक्चर, बबल इफेक्ट आणि संपूर्ण डिझाइन तयार करताना अनेक अडचणी आल्याचेही या व्हिडीओत पाहायला मिळते.
उर्फीने स्वतः सांगितले की, हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण फॅशन एक्सपेरिमेंट्सपैकी एक होता. तिने मजेशीर अंदाजात म्हटले की, “मूळ ड्रेस कोट्यवधी रुपयांचा होता, पण आम्हाला तो कमी बजेटमध्ये तयार करायचा होता.” तिच्या या वक्तव्याचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
उर्फीचा हा नवीन लूक अनेकांना आवडला असून तिच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक होत आहे. काही सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या मेहनतीला दाद दिली आहे. मात्र, काहींनी तिला “ड्रेस कॉपी केला” म्हणून ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. यावर उर्फीनेही स्पष्ट उत्तर दिले आहे. तिने BTS व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “हो, आम्ही हा ड्रेस रीक्रिएट केला आहे. पण कॉपी तेव्हा म्हणतात जेव्हा एखादी गोष्ट स्वतःची असल्याचा दावा केला जातो.”
उर्फी जावेदचा हा व्हिडीओ आणि तिची स्पष्ट भूमिका सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिच्या हटके फॅशन सेन्समुळे ती पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे.





