चिंतन : डिजिटल कितपत सुरक्षित?

– डॉ. ऋतु सारस्वत
गेल्या काही दिवसांत अॅप्समध्ये दडलेले डिजिटल जग उघड केल्याची प्रकरणे घडली आहेत. डिजिटल जगावर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो आणि त्यास सर्वस्व अर्पण करतो. परिणामी डिजिटल जगात असणारी प्रत्येक वस्तू ही एखाद्या लॉकरप्रमाणे सुरक्षित राहते असा विचार करण्याची चूक कशी झाली? हा खरा प्रश्न आहे.
मानवाच्या बुद्धीचा विकास कालानुरूप झाला असून तो डिजिटल जगाच्या तुलनेत अतिशय वेगळ्या पद्धतीने म्हणजे वास्तवावर आधारित झाला आहे. तरीही गेल्या काही दशकांपासून, प्रामुख्याने पंधरा वर्षांपासून इंटरनेट, सोशल मीडिया आणि एआयसारख्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मानवाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. आपल्या संवादात, ज्ञान मिळवण्यात आणि जगासमोर प्रकट होण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला. यानुसार आपण डिजिटल युगाच्या आहारी गेलो आणि तेच आपले जग असल्याचे मानू लागलो.
ङ्गिर्थ जे ङ्ग्रोम आणि त्यांच्या साथीदारांनी अभ्यास अहवाल ‘ङ्ग्रॉम ऑनलाइन ब्रेन्स टू ऑनलाइन लाइव्हस अंडरस्टँडिंग द इंडिविजुअलाइज्ड इम्पॅक्ट ऑङ्ग इंटरनेट युज अक्रॉस इंडिव्हिज्युअल्ड इम्पॅक्टस ऑङ्ग इंटरनेट अक्रॉस सायकॉलॉजाइॅड कॉग्निटिव्ह अँड सोशल डिमेन्सन्स’ मध्ये म्हटल्यानुसार तंत्रज्ञानाच्या प्रचंड वेगामुळे मेदूतील वास्तवाला धरून असलेली विकासाभिमुख रचना आणि आधुनिक डिजिटल संस्कृतीकडे वाढता ओढा यात ताळमेळ बसवताना तारांबळ उडताना दिसते.
2019 मध्ये ‘सायकियाट्रियत’ प्रकाशित ङ्गिर्थ यांचा अभ्यास अहवाल ‘द ऑनलाइन ब्रेन : हाऊ द इंटरनेट’ यात त्यांनी ‘बी चेंजिंग ऑर कॉग्निशन’ लेखात मानवी मेंदूची संरचना आणि डिजिटल आक्रमण यात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यात म्हटल्यानुसार, आपल्या मेंदूवर एक वास्तविक विकासवादी इतिहासाची छाप असून त्याची सजीवता ही नैसर्गिक वातावरणातील सजगता आणि सुक्ष्म घडामोडींच्या सामाजिक गतीशीलतेवर अवलंबून आहे.
मेंदूची रचना आणि त्याची कार्यप्रणाली ही प्रत्यक्षात काळानुसार प्रस्थापित होणारे सामाजिक संबंध, मौलिक माहिती आणि तत्कालिन काळातील भौतिक स्थितीनुसार विकसित झाली आहे. आजच्याप्रमाणे ऑनलाइन माहितीच्या आधारे बुद्धीचा विकास झालेला नाही. अर्थात मेंदू असामान्य रुपाने लवचिक नाही. देहाने आणि कोहेन यांनी ‘कल्चरल रिसायकलिंग ऑङ्ग कॉर्टिकल मॅप्स: हाऊ रीडिंग अँड मॅथमॅटिक्स रिशेप ह्युमन कॉर्टेक्स, न्यूरॉन’ मध्ये मेंदूच्या अशा प्रकारच्या विकासाच्या स्थितीला बायोलॉजिकल अबस्ट्रॅट असे म्हटले आहे. (जैविक अडथळा) आपण मानवी जीवनातील डिजिटल घडामोडींचा विचार करतो तेव्हा हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
इंटरनेट, सोशल मीडिया आणि एआयने गेल्या काही दशकांपासून क्रांती घडवलेली असून तो मोठा अविष्कार मानला जातो. तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व गतीने मानवी मेंदू आणि त्यास अनुसरून क्षमता विकसित करण्याचे एक गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. कारण यात सांस्कृतिक आणि रचनात्मक मार्गाने नाट्यमय बदल होत असताना विकासाभिमुख प्रक्रियेबरोबर ताळमेळ बसविण्यासाठी मेंदूला पुरेसा कालावधी दिला नाही. ज्या गतीने ही उपकरणे मानवी जीवनात सामावली गेली, तेथे मेंदूची विकासात्मक रचना आणि आधुनिक डिजिटल जग याच्यात ताळमेळ बसताना गोंधळ निर्माण होऊ लागला. म्हणून मेंदूची नैसर्गिक गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता या वेगाने होणार्या बदलाशी ताळमेळ मिळवू शकते का? आणि त्यात सामावले जात असताना गुंतागुंत निर्माण होईल का?
डिजिटल आणि वास्तविक जग यात ङ्गरक असल्याचे मेंदूच्या रचनात्मक स्थितीला जमवून घ्यावे लागणार आहे. म्हणजे एकीकडे वास्तविक जग मान्य करत असताना आभासी जग हा केवळ दिखावा आहे, हे त्याला पटवून घ्यावे लागणार आहे. जेव्हा डिजिटल जवळीकतेचा मुद्दा येतो तेव्हा आतापर्यंतची सामाजिक व्यवस्था पाहिली तर त्याकडे एक ङ्गसवे जग म्हणूनच पाहिले गेले आणि कधी कधी तिरस्काराच्या नजरेतूनही बघितले गेले आहे. विशेष म्हणजे याच जगाला आपण सुरक्षित जग म्हणून समजू लागलो आणि तेथेच सर्वस्व अर्पण करू लागलो. पण आभासी जगात सुरक्षेची हमी कोणीच देत नाही.
शेवटी या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी मेंदूच्या रचनात्मक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. अर्थात ही दीर्घकाळ प्रक्रिया असली तरी त्याची सुरुवात करणे तितकेच आवश्यक आहे. मानवी मेंदूने डिजिटल जगाचे वास्तव ओळखायला शिकले पाहिजे आणि जगासमोर येणारे आभासी जग हे मानवी बुद्धिमत्तेतून नाही तर मेंदूतील रचनात्मक बदलाच्या प्रक्रियेचा भाग आहे, हे ओळखले पाहिजे. हाच बदल डिजिटल जगात सुरक्षा देण्याचे काम करेल आणि डिजिटल जगात असलेले विश्व हे एखाद्या कुलुपबंद खोलीप्रमाणे सुरक्षित नसून त्याकडे हजारो डोळ्याचे लक्ष असल्याचे मान्य करेल.
सध्याचा समाज अनामिक संघर्षातून जात असून तेथे डिजिटल जगाचे अस्तित्व नाकारले जाणार नाही. परंतु त्याचे वर्तमान काळातील रूप देखील मान्य केले जाणार नाही. प्रामुख्याने जेव्हा डिजिटल जगाशी असलेल्या संबंधाचा मुद्दा येतो तेव्हा आहे तसे स्वरूप मानले जाणार नाही. कारण त्यामुळे मनात निर्माण होणारी असुरक्षितता ही एखाद्या शारीरिक वेदनेप्रमाणेच क्लेषदायी आणि वेदनादायी आहे.
सध्याची प्रचलित कायदा आणि सुव्यवस्था वास्तवातील जगात मानसिक आणि शारीरिक हानी पोचवणार्यांना दंड देत असेल तरी तो अद्याप डिजिटल जगातील मानसिक त्रासाला कायद्याच्या चौकटीत घेणारा नाही. त्यामुळे डिजिटल जगाकडून होणारा छळ हा शारीरिक छळापेक्षा कमी नाही, हे मान्य करावे लागेल. त्यामुळे सध्याच्या काळात सामाजिक आराखड्याचा भाग म्हणून डिजिटल व्यवस्था समोर येत असेल तर त्यानुसार कायदेशीर व्यवस्था विकसित करणे गरजेचे असून ती काळाची गरज बनली आहे.





