‘बांगलादेशात डेट करू नका किंवा लग्न करू नका…’ ; चीनने त्यांच्या नागरिकांना का केले असे आवाहन?

Bangladesh-China । शेख हसीना यांच्यापासून चीन बांगलादेशशी आपले संबंध मजबूत करत आहे. परंतु अलिकडेच चिनी दूतावासाने एक नोटीस जारी करून चिनी नागरिकांना बांगलादेशातील महिलांशी संबंध ठेवण्यापासून किंवा लग्न करण्यापासून रोखण्याचा इशारा दिला आहे.
बांगलादेशातील चिनी दूतावासाने काल रात्री उशिरा एक नोटीस जारी केली. ज्यामध्ये, “चीनी नागरिकांनी परदेशात लग्नाबाबत संबंधित कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे, बेकायदेशीर मॅचमेकिंग एजंट्सपासून दूर राहावे आणि लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरील सीमापार डेटिंग सामग्रीमुळे दिशाभूल होऊ नये.” असे म्हटले आहे. पुढे दूतावासाने म्हटले आहे की त्यांनी “परदेशी पत्नी खरेदी करण्याचा” विचार नाकारावा आणि बांगलादेशात लग्न करण्यापूर्वी दोनदा विचार करावा.” असा थेट इशाराच नागरिकांना देण्यात आला आहे.
देशाबाहेर लग्न करण्याबद्दल चिनी कायदा काय म्हणतो? Bangladesh-China ।
दूतावासाच्या निवेदनात म्हटले आहे की, “चिनी कायद्यानुसार, कोणत्याही विवाह संस्थेला सीमापार विवाह जुळवणी सेवांमध्ये सहभागी होण्याची किंवा लग्न लपवण्याची परवानगी नाही आणि कोणत्याही व्यक्तीला फसव्या पद्धतीने किंवा नफ्यासाठी अशा गोष्टी करण्याची किंवा लपवण्याची परवानगी नाही.
आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान टाळण्यासाठी दूतावास चिनी नागरिकांना सीमापार व्यावसायिक विवाह एजन्सींपासून दूर राहण्याचा आणि ऑनलाइन प्रेम घोटाळ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देतो. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, अशा घोटाळ्यांना बळी पडलेल्यांनी चीनमधील सार्वजनिक सुरक्षा अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार करावी.
चीनला काळजी का आहे? Bangladesh-China ।
गेल्या काही दिवसांत मानवी तस्करीची प्रकरणे समोर आल्यानंतर चीनने हे निर्देश दिले आहेत. बांगलादेश मानवी तस्करीवर कडक कारवाई करतो. बांगलादेशमध्ये बेकायदेशीर सीमापार विवाहांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना तस्करीच्या संशयावरून अटक केली जाऊ शकते, ज्यामुळे चिनी नागरिकांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा दूतावासाने दिला.





