नवी दिल्ली – रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बिहारमधील बेतिहा इथं सांगितलं. नुकत्याच झालेल्या दिड लाख भरती प्रक्रियेव्यतिरिक्त या जागांची भरती होईल असंही त्यानी स्पष्ट केले.
नमो आणि वंदे भारत रेल्वेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या रेल्वेगाड्यांचे उद्पादन वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. बिहारमध्ये सरकार 95 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामुळे बिहार रेल्वेक्षेत्रात मोठा बदल अपेक्षित आहेत असंही ते म्हणाले.