पिंपरी, (प्रतिनिधी) – निगडीतील अन्नधान्य पुरवठा कार्यालयात नव्याने दोन अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्नधान्य वितरण दक्षता समितीच्या वतीने सदस्य के.एम. बुक्तर यांनी या दोन्ही अधिकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
निगडी येथील अन्नधान्य पुरवठा कार्यालयाच्या ज विभागात झोनल ऑफीसरपदी प्रदीप डंगारे यांची तर परिमंडळ अ विभागात विजयकुमार क्षाीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकार्यांचे बुक्तर यांनी स्वागत केले.
निगडीतील अन्नधान्य वितरण विभागात अधिकार्यांची नियुक्ती रखडली होती. याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर दिसून येत होता.
याची दखल गेत, या कार्यालयात दोन अधिकार्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आल्याने, या किार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा करण्यास हातभार लागणार आहे. त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे.