Shriya Saran : “‘आवारापन’साठी नामांकनं मिळाली, पण मला कुणी विचारलंच नाही”; तब्बल 19 वर्षांनी अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Shriya Saran : अशातच पहिला भागात काम केलेली अभिनेत्री श्रिया सरनने मोठा खुलासा केला आहे.

Shriya Saran : २००७ मध्ये आवारापन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाकडे कल्ट चित्रपट म्हणून पाहिले जाते. दिग्दर्शक मोहित सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते. १९ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच पहिला भागात काम केलेली अभिनेत्री श्रिया सरनने मोठा खुलासा केला आहे.
‘आवारापन २’ च्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री श्रिया सरनने नुकतीच पिंकविलाला एक मुलाखत दिली असून, त्यात तिने चित्रपटाला घेऊन अनेक गुपिते उघड केली आहेत. ती म्हणाली “जेव्हा ‘आवारापन’ बनत होता, तेव्हा मी खूप उत्साहित होते. मला वाटले होते की हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल आणि हिट होईल. पण तसे झाले नाही आणि आमचा चित्रपट अयशस्वी ठरला.”
पुढे ती म्हणाली “मला वाटते की ‘आवारापन’ त्या वेळी त्याच्या काळाच्या खूप पुढे होता. चित्रपट यशस्वी झाला नसला तरी, त्याला अनेक पुरस्कार सोहळ्यांसाठी नामांकन मिळाले होते. पण मला कुठल्याही सोहळ्यात आमंत्रित केले गेले नाही, याचे मला आश्चर्य वाटले.” असा मोठा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
तसेच चित्रपटाच्या अपयशामुळे इंडस्ट्रीमध्ये भेदभावाला सामोरे जावे लागले, असेही तिने सांगितले. दरम्यान, ‘आवारापन २’ हा चित्रपट शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अभिनेता इम्रान हाशमी शिवम पांडेच्या भूमिकेत झळकणार असून, अभिनेत्री दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय शबाना आजमींसह अनेक कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
श्रिया सरनचा पुढचा चित्रपट
श्रिया सरनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास ती अजय देवगणच्या सस्पेन्स थ्रिलर फ्रँचायझी ‘दृश्यम ३’ मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या फ्रँचायझीमधील श्रियाचे मागील दोन्ही चित्रपट हिट ठरले आहेत.
Pune Congress Protest : ‘खड्डे मे बर्थडे’, थेट खड्ड्यात केक कापत काँग्रेसचे अभिनव आंदोलन





