Haryana Election : हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र निवडणुकीआधी भाजपमध्ये बंडाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी 4 सप्टेंबरपासून सुरू झालेली बंडखोरी अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि आंदोलनाची प्रक्रिया सुरूच असून तीन दिवसांत पक्षाच्या 72 नेत्यांनी आणि सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याबाबत भाजपात नाराजीचा सुर असल्याचे दिसून येते आहे. पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री संजीव बल्यान, प्रदेश प्रभारी डॉ. सतीश पुनिया, प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली, प्रदेश संघटन सरचिटणीस फणींद्र नाथ शर्मा, प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र पुनिया, डॉ.अर्चना गुप्ता, कृष्णा बेदी यांच्यासोबत संध्याकाळी 6 च्या सुमारास बैठक घेतली. यानंतर त्यांनी निवडणुकीच्या तिकिटांसंदर्भात भेटायला आलेल्या नेत्यांची एकामागून एक भेट घेतली. रोहतक येथील राज्य कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर नायब सैनी यांनी सफिडॉनमधील करमबीर सैनी, रेवाडीचे रणधीर कपरीवास, बावलचे कृष्णा वाल्मिकी, रोहतक शहराचे माजी महापौर मनमोहन गोयल, माजी वरिष्ठ उपमहापौर राजकमल सहगल, रमेश भाटिया, गोहाना येथील उमेश शर्मा आणि इतर नेत्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी नेत्यांना समजावून सांगितले की, कमळाचे एकच फूल असल्याचे समजावून सांगितले. निवडणुकीत एकत्र काम करण्याचे आवाहन केले. तसेच तिकीट कोणाचेही बदलले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.